Pune Accident News : मावळमध्ये दुर्दैवी घटना; बास्केटबॉल खेळताना लोखंडी स्टॅन्ड अंगावर पडला अन् ....

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ (Maval) तालुक्यात घडलेल्या एका दुर्दैवी अपघाताने खळबळ उडाली आहे. बास्केटबॉल खेळताना लोखंडी स्टॅन्ड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणामुळे सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


इंदोरी येथील तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूटमध्ये ही घटना घडली. विशाल वर्मा (वय 20) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो बी. टेकच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. अपघात इतका गंभीर होता की त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.



नेमकी घटना कशी घडली?


मिळालेल्या माहितीनुसार, विशाल वर्मा हा मूळ उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील रहिवासी असून, तो शिक्षणासाठी पुण्यात वसतिगृहात राहत होता. रविवारी सकाळी सुमारे 7.30 वाजता तो बास्केटबॉल खेळण्यासाठी मैदानात गेला होता. खेळ सुरू असताना अचानक बास्केटबॉल पोस्टवरील जाड लोखंडी स्टॅन्ड निकामी होऊन त्याच्यावर कोसळला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.



घटनेबाबत वेगवेगळे दावे


या दुर्घटनेनंतर नेमकी घटना कशी घडली याबाबत दोन भिन्न मते समोर येत आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, खेळ सुरू असताना अचानक स्टॅन्ड कोसळला. तर महाविद्यालय प्रशासनाच्या मते, संबंधित विद्यार्थी रिंगला लटकून व्यायाम करत होता आणि त्यावेळी स्टॅन्ड त्याचे वजन सहन करू शकला नाही.



विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण


घटनेनंतर संस्थेतील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये निष्काळजीपणा झाल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. तसेच जखमी अवस्थेत रुग्णालयात हलवण्यात विलंब झाल्याचाही आरोप पुढे येत आहे.



कुटुंबावर दुःखाचा डोंगर


या घटनेची माहिती मिळताच विशालचे आई-वडील अयोध्याहून पुण्यात दाखल झाले. शिक्षणासाठी घरापासून दूर गेलेल्या मुलाचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.



पोलिस तपास सुरू


घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी सध्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत. या घटनेत निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे