Monday, April 6, 2026

Pune Railway Station : पुणे - रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट

Pune Railway Station : पुणे - रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट

पुणे : पुणे स्थानकाच्या मुंबईच्या दिशेने असलेल्या यार्डमध्ये सहा नवीन फलाट होणार आहेत. फलाट क्रमांक ७ ते १२ असे हे फलाट असतील. या फलाटावर प्रवाशांना येण्यासाठी जुना मालधक्का येथून प्रवाशांना प्रवेश दिला जाईल. हे स्थानकाचे तिसरे प्रवेशद्वार असणार आहे.

शिवाय, सध्या असलेले फलाट व नवीन फलाट यांना जोडण्यासाठी पादचारी उड्डाण पूल (स्कायवॉक) बांधला जाणार असून, पार्सलच्या वाहतुकीसाठी भुयारी मार्ग (सबवे) असणार आहे. लवकरच याच्या कामाला सुरुवात होणार असून, दीड वर्षात काम संपणार आहे. यासाठी सुमारे ४०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पुणे रेल्वे स्थानकाचा विकास करताना त्याची क्षमता देखील वाढविण्यात येणार आहे.

यात मुंबईच्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार पुणे रेल्वे स्थानक हे देशातील सुवर्ण चतुष्कोण रेल्वे मार्गावरचे एक प्रमुख स्थानक आहे. व्यस्त रेल्वे मार्गावर पुणे स्थानक असल्याने येणाऱ्या काळात तिसरी आणि चौथी मार्गिकाने पुण्याला जोडले जाईल. सध्या पुणे ते वाडी दरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गिकाचा सर्वे सुरू आहे.

Comments
Add Comment