इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे झालेल्या एका रॉकेटसदृश हल्ल्यात झोपेत असलेल्या दोन निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून, सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात अन्य दोन नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून सरकारने पाच जिल्ह्यांत इंटरनेट सेवा तीन दिवसांसाठी बंद केली आहे.
सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील चिपी ...
झोपेतच काळाचा घाला
जमावाचा उद्रेक आणि गोळीबार
दोन निष्पाप बालकांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच बिष्णुपूर आणि इंफाळमध्ये जनक्षोभ उसळला. संतप्त जमावाने रस्त्यावर टायर जाळून रस्ते अडवले. आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांना आणि तेलाच्या टँकरला आग लावली. परिस्थिती हाताबाहेर जात असताना जमावाला पांगवण्यासाठी सीआरपीएफने (CRPF) केलेल्या गोळीबारात दोन आंदोलकांचा मृत्यू झाला, ज्यामुळे तणाव अधिकच वाढला आहे.