Lashkar-e-Taiba : श्रीनगर पोलिसांची मोठी कारवाई; पोलिसांकडून लष्कर-ए-तैयबा नेटवर्कचा भंडाफोड

- दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांसह पाच जणांना अटक


श्रीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित एका आंतरराज्यीय दहशतवादी मॉड्यूलचा भंडाफोड केला आहे. या ऑपरेशनदरम्यान दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांसह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. श्रीनगरमधून अब्दुल्ला उर्फ अबू हुरैरा याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.



१६ वर्षांपासून फरार असलेला अब्दुल्ला अखेर पोलिसांच्या ताब्यात :


मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल्ला हा गेल्या १६ वर्षांपासून फरार होता. जम्मू-काश्मीरच्या बाहेर लष्कर-ए-तैयबाची ठिकाणे उभारण्यात तो यशस्वी झाला होता. पोलिसांनी सांगितले की, अब्दुल्लासोबतच पाकिस्तानी दहशतवादी उस्मान उर्फ खुबैब यालाही या मोठ्या कारवाईत अटक करण्यात आली आहे. या मोठ्या कारवाईत जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत केंद्रीय यंत्रणांनीही सहभाग घेतला. तपास यंत्रणांनी जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि हरियाणा यांसह १९ ठिकाणी छापे टाकले असून आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे.



लष्कर-ए-तैयबाच्या नेटवर्कचा पर्दाफाश :


तपासादरम्यान लष्कर-ए-तैयबाच्या एका सखोल नेटवर्कचा पर्दाफाश झाला, जे दहशतवाद्यांना साहित्य आणि आर्थिक मदत पुरवण्यात सहभागी होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या पाच जणांपैकी तीन जण श्रीनगरचे रहिवासी आहेत. तसेच मोहम्मद नकीब भट, आदिल राशिद भट आणि गुलाम मोहम्मद मीर उर्फ मामा यांना दहशतवाद्यांना आश्रय, अन्न आणि इतर रसद सहाय्य पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.



४० विदेशी दहशतवाद्यांचे नेतृत्व :


अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपासातून समोर आले आहे की एका विदेशी दहशतवाद्याने लष्कर-ए-तैयबाच्या नेटवर्कच्या मदतीने बनावट कागदपत्रे आणि ओळखपत्रांच्या आधारे देशाबाहेर प्रवास करण्यात यश मिळवले होते. हे दहशतवादी सुमारे १६ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी करून आले होते आणि काश्मीर खोऱ्यातील विविध जिल्ह्यांत सक्रिय होते. या कालावधीत त्यांनी सुमारे ४० विदेशी दहशतवाद्यांचे नेतृत्व व समन्वय केले होते. यापैकी बहुतेक दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी चकमकीत ठार केले आहे.

Comments
Add Comment

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’

Independence Day : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी लाल किल्ला सज्ज

नवी दिल्ली : यंदा शनिवार १५ ऑगस्ट २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत लाल किल्ल्यावर ८० वा

Sangeet Natak Akademi Award : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

· महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव · संगीत, नृत्य, नाट्य व लोककलेतील योगदानाचा

Vande Mataram : वंदे मातरमच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय गीत गायले जाणार

जेन-झींचं प्रतिनिधीत्व अधिक पाहायला मिळणार नवी दिल्ली : सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण मानला जाणाऱ्या