Metro-9 from Dahisar to Mira Bhayandar दहिसर ते मीरा भाईंदर 'मेट्रो-९'ला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा सुरू; वाहतूक कोंडीतून होणार सुटका


मुंबई : मुंबईच्या वेशीवर असलेल्या मीरा-भाईंदर शहराला जोडणारी महत्त्वाकांक्षी ‘मेट्रो-९’ मार्गिका अखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. दहिसर (पूर्व) ते काशिगाव या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातून धावणारी ही पहिली मेट्रो सेवा ठरली असून, यामुळे दहिसर चेकनाक्यावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची मोठी सुटका होणार आहे.


दहिसर (पूर्व) मेट्रो स्थानक येथे आयोजित या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्यासह मेट्रो प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लोकार्पणानंतर मुख्यमंत्र्यांनी नव्या मेट्रोतून प्रवास करत सुविधांचा आढावा घेतला.


मेट्रो मार्गिका ९ ही दहिसर (पूर्व) ते मीरा भाईंदर दरम्यान १०.५ किमी लांबीची उन्नत मार्गिका आहे. यातील पहिल्या टप्प्यात दहिसर ते काशिगाव दरम्यान ४.७ किमीचा मार्ग सुरू झाला आहे. यात दहिसर (पूर्व), पांडुरंगवाडी, मिरागाव आणि काशिगाव या चार स्थानकांचा समावेश आहे. या सेवेमुळे दहिसर टोल प्लाझा येथील वाहतूक कोंडी १० ते १५ टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, रस्त्यावरील साधारण २० ते ३० टक्के प्रवासी मेट्रोकडे वळल्यास पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ताण हलका होण्यास मदत होईल.



'मल्टी मोडल' प्रणाली


ही मेट्रो मार्गिका दहिसर (पूर्व) येथे मेट्रो-७ (दहिसर ते अंधेरी) आणि पुढे ७-अ (विमानतळ जोडणी) च्या माध्यमातून 'रेड लाईन'शी जोडली गेली आहे. यामुळे मीरा-भाईंदरमधील रहिवाशांना थेट मुंबई विमानतळापर्यंत अखंड प्रवास करणे शक्य होणार आहे. बस आणि ऑटोरिक्षा यांच्याशी असलेल्या 'मल्टी मोडल' एकात्मिकरणामुळे प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागणार नाही.



पर्यावरणपूरक आणि आधुनिक प्रवास


या मेट्रोमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग यंत्रणा जोडण्यात आली आहे. यामुळे गाड्यांच्या ब्रेकमुळे निर्माण होणारी ऊर्जा पुन्हा वापरली जाणार असून, यामुळे विजेची मोठी बचत होईल. इलेक्ट्रिक मेट्रोमुळे कार्बन उत्सर्जनात घट होऊन हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. स्थानकांवर लिफ्ट, सरकते जिने, सीसीटीव्ही यंत्रणा आणि दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष स्पर्शक्षम मार्गांची सोय करण्यात आली आहे. संपूर्ण प्रणालीवर रिअल-टाइम देखरेख ठेवण्यासाठी केंद्रीकृत नियंत्रण कक्ष कार्यरत राहील.

Comments
Add Comment

Mumbai Metro 9 Inauguration : अखेर दहिसर-काशिगाव मेट्रो लाईन ९ चे होणार उद्घाटन; जाणून घ्या स्थानके, तिकीटाची किंमत

मुंबई : तारीख पे तारीख म्हणत आज अखेर मुंबई मेट्रो ९ ( दहिसर ते काशीगाव ) या मार्गिकेचे उदघाटन संपन्न होणार आहे.

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावल्या, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या