अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू


मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत देण्यात आल्य़ाची माहिती मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.


ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने राज्यात शेतीचे सुमारे १ लाख १४ हजार ७५२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यामुळे १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्य़ांच्या शेती आणि शेतीमालाचे नुकसान झाले. या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना १२८.८६ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. हे नुकसान प्रामुख्याने चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात नुकसान झाले होते.


जानेवारी ते मार्च २०२६ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे एकूण १ लाख ४५ हजार ६०६ हेक्टरखालील शेतीचे नुकसान झाले असून २ लाख ३३ हजार ८९० शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या पावसामुळे केळी, कांदा, पपई, आंबा, द्राक्षे, गहू, हरभरा, ज्वारी इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने लातूर, सोलापूर, नाशिक, सातारा, धुळे, नंदूरबार, यवतमाळ, अहिल्यानगर, पुणे, जालना, छत्रपती संभाजी नगर, बुलढाणा, आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या अवकाळी पावसामुळे पाच लोकांचा मृत्यु आणि नऊ लोक जखमी झाले. अवकाळी पावसामुळे ३६ जनावरांचाही मृत्यु झाला आहे.


एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या पावसानेही १ लाख ९४ हजार ३२९ शेतकऱ्यांच्या १ लाख २२ हजार ९९३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजानुसार स्पष्ट झाले आहे. जानेवारीपासून झालेल्या अवकाळी पावसाने नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे.



१०५ टीएमसी पाणीसाठा तयार


दरम्यान, जुलै २०२२ पासून जलसंपदा विभागाचे ४१ प्रकल्प पूर्ण झाले असून सुमारे १०५ टीएमसी पाणीसाठा तयार झाला असल्याची माहिती देण्यात आली. या प्रकल्पांमुळे अतिरिक्त २.९५ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. जुलै २०२२ पासून आजपर्यंत २२५ प्रकल्पांना सुधारित तसेच प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या मान्यता ४.३५ लाख कोटी रुपयांच्या असून हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ३३.४५ लाख हेक्टर सिंचन क्षमता तयार होईल, अशी माहिती जलसंपदा विभागाने सादरीकरणाद्वारे दिली.

Comments
Add Comment

Ahilyanagar Crime : साड्या पाहण्याचा बहाणा केला अन् 14 तोळ्याचे दागिने पळवले

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. साड्या पाहण्याचा बहाणा करत चक्क मैत्रिणीच्याच घरातून 14

Pune Crime : पुण्यात ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेव्हीक्विक ओतल्याची खळबळजनक घटना!

पुणे : कौटुंबिक वादातून चिडलेल्या एका महिलेने स्वतःच्याच ९ महिन्यांच्या निष्पाप पुतण्याच्या तोंडात अत्यंत

Jalgaon : जळगावात अनधिकृत होर्डिंग्जवर मनपाचा बडगा, नागरिक समित्यांची स्थापना; २४ तासांत कारवाई बंधनकारक

Jalgaon : जळगाव शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, फ्लेक्स आणि पोस्टर्समुळे शहराचे सौंदर्य बिघडत असून वाहतुकीलाही

Pune Autorickshaw Fare Hike : पुणेकरांना महागाईचा झटका : १ सप्टेंबरपासून ऑटो रिक्षा प्रवास महागणार; RTA कडून नव्या भाडेवाढीवर शिक्कामोर्तब!

पुणे : पुणे शहर आणि परिसरात ऑटो रिक्षाने दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना आता आपल्या खिशाला जास्तीची कात्री

Jalgaon : 'मिशन ग्रीन जळगाव सिटी’ अंतर्गत 1 लाख वृक्षारोपण, १० ऑगस्टपासून मोहिमेला सुरुवात

Jalgaon : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित महाराष्ट्र मिशन (Green Maharashtra Mission) अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिका

Mumbai Metro : एमएमआरडीए मेट्रोचा नवा विक्रम! ३० कोटी प्रवाशांचा टप्पा पार; अवघ्या १७९ दिवसांत शेवटचे ५ कोटी प्रवासी

मार्गिका २अ, ७, २ब (टप्पा-१) आणि ९ (टप्पा-१) वर वाढता प्रतिसाद; सरासरी दैनंदिन प्रवासीसंख्या २.७९ लाखांवर मुंबई :