Middle East War : मध्यपूर्व युद्ध पुन्हा पेटलं! इराणचा भारताला संपर्क, उच्चस्तरीय चर्चा सुरु

मुंबई : इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष शांत होण्याचे नाव घेत नाहीये. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे होर्मूझ सामुद्रधुनी सध्या जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतालाही याचे थेट परिणाम जाणवू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी इराणकडून थेट संपर्क साधण्यात आला आहे.



भारत-इराण उच्चस्तरीय चर्चा


इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी जयशंकर यांना फोन करून सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. याचबरोबर कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांच्यासोबतही भारताने संवाद साधला. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे व्यापार, ऊर्जा पुरवठा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर ही चर्चा महत्त्वाची मानली जात आहे.



ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम


दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मूझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम दिल्याची माहिती समोर आली आहे. “सामुद्रधुनी खुली केली नाही तर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशाराही देण्यात आल्याचे सांगितले जाते.



भारताची जहाजे अडकली


होर्मूझ सामुद्रधुनीत तणाव वाढल्यामुळे भारतासह अनेक देशांची जहाजे अडकली असल्याची माहिती आहे. ही ३२ किमी अंतर असलेली सामुद्रधुनी जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची असून, जगातील मोठ्या प्रमाणात कच्चे तेलाची याच मार्गाने जलवाहतूक केली जाते.



तेल दरवाढ आणि जागतिक परिणाम


सामुद्रधुनीत अडथळे निर्माण झाल्याने जागतिक बाजारात तेलाच्या किमती झपाट्याने वाढू लागल्या आहेत. अनेक देशांमध्ये इंधन तुटवडा आणि आर्थिक तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या भारतात पुरेसा तेल साठा आणि गॅससाठा असला तरी अनेक देशांत तेल आयात करणाऱ्या देशांसाठी ही परिस्थिती अधिक चिंताजनक ठरू शकते.


होर्मूझ सामुद्रधुनीतील तणाव हा केवळ प्रादेशिक मुद्दा राहिलेला नसून जागतिक अर्थव्यवस्था आणि ऊर्जा सुरक्षेसाठी मोठे आव्हान ठरत आहे. इतर देशांमध्ये या युद्धामुळे कोणतीही भीषण परिस्थिती जाणवू नये यासाठी भारतासह अनेक देश परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत

Comments
Add Comment

Udhampur Accident: धमपूरमध्ये टँकरची डंपरला जोरदार धडक लागताच लागली भीषण आग; महामार्गावर थरकाप उडवणारी परिस्थिती

उधमपूर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर परिसरात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री उशिरा तेल टँकर आणि

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला