Baramati Assembly by-election : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भरला उमेदवारी अर्ज

बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज म्हणजेच सोमवार ६ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित सभेत सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.



काय म्हणाल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ?


यावेळी अजितदादांच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले त्या भावूक होत म्हणाल्या की, “२ महिन्यांपूर्वी आम्ही लाडक्या नेत्याला गमावले. बारामती पोटनिवडणुकीचा अर्ज मी दाखल करत आहे. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की दादा आज नाहीत हे मला आजही मान्य नाही, पण नियतीने हा काळ आणला आहे. बारामतीकरांची सेवा करणे म्हणजे दादांच्या विश्वासाचा आधार होता. बारामती हा दादांचा श्वास होता, त्यामुळे त्यांचा अखेरचा श्वासही बारामतीच्या मातीत राहिला.”


त्यांनी सांगितले की बारामतीतील प्रत्येक झाड, पान, फुल, रस्ते, शाळा, नदी आणि इमारतींमध्ये अजित पवारांचा स्पर्श आहे. सदस्यतेसाठी अर्ज दाखल करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “तुमचं प्रेम, पाठिंबा आणि साथ हीच माझी शक्ती आहे. गेल्या ३५-३६ वर्षांत अजितदादांना बारामतीकरांनी प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं. आजची निवडणूक दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी आहे.” बारामती पोटनिवडणूक राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण ठरत असून, सर्व पक्ष आणि मतदार या निवडणुकीकडे लक्ष ठेवून आहेत. सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणात अजित पवार यांच्या बारामतीशी असलेल्या घट्ट नात्यावर बद्दल सांगितले, त्या म्हणाल्या की, "प्रत्येक बारामतीकर हा दादांसाठी पांडुरंग होता आणि दादांसाठी बारामती श्वास होती.” म्हणून त्यांचा अखेरचा श्वासदेखील बारामतीच्या मातीत विसावला, असे सांगतनाच सुनित्रा पवार यांना गहिवरुन आले. दादाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि बारामतीचा विकास करण्यासाछी मी माझे दुःख तळघरात कोंडून अत्यंत धीराने आपल्या सर्वांसाठी बाहेर पडले हा धीर बारामतीकरांकडे बघूनच आला आहे. तुमची साथ ही माझी शक्ती आहे.

Comments
Add Comment

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Maharashtra Pollution Control Board : उद्योग क्षेत्रातील 'लायसन्स राज'ला लगाम

- प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती शुल्कात कपात; ५ ते २५ वर्षांची रक्कम एकत्रित भरण्याची सोय मुंबई : राज्यातील

Kriti Sanon Raksha Bandhan Ad : ट्रोलिंगचा दणका! क्रिती सेननला बसला मोठा धक्का; वादानंतर ब्रँडने जाहिरातच घेतली मागे

Kriti Sanon Raksha Bandhan Ad  : अभिनेत्री क्रिती सेनन रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली होती. तिच्या

Nepal flood news : नेपाळमध्ये ढगफुटीसदृश भीषण पूर! अनेक गावांसह हजारो नागरिक वाहून गेल्याची भीती; पॉवर प्रोजेक्ट्स, रस्ते आणि पुलांचे मोठे नुकसान

काठमांडू : हिमालयीन देश असलेल्या नेपाळमध्ये निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळत आहे. तिबेटच्या सीमेला लागून

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१

Unique Grand Opening : नेते अन् अभिनेते सोडाच; सँडविच दुकानाच्या उद्घाटनाला आला चक्क 'रोबोट VVIP'! बाउन्सर अन् ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत

उज्जैन : सध्या तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, रोबोट्स केवळ कारखान्यांपुरते किंवा संशोधनापुरते मर्यादित