विरारमध्ये आणखी २ प्लॅटफॉर्मवरून धावणार १५ डब्यांच्या लोकल

चार महिन्यांत प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम पूर्ण


विरार : पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. यामुळे आता या स्थानकावर १५ डब्यांच्या लोकल ट्रेन सहजपणे थांबू शकतील. प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ ची रुंदी ४ मीटरने वाढवण्यात आली असून, हे काम 'मुंबई रेल्वे विकास महामंडळाने' (MRVC) अवघ्या ४ महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे. यासोबतच, स्थानकाच्या पश्चिम भागात नवीन 'होम प्लॅटफॉर्म क्रमांक ८' देखील तयार करण्यात आला आहे. यामुळे विरार स्थानकावरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल गाड्यांचे संचलन अधिक सुलभ आणि शिस्तबद्ध होणार आहे. लवकरच या नवीन प्लॅटफॉर्मवरून १५ डब्यांच्या लोकल सेवा सुरू केल्या जातील. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तयार झालेले सर्व प्लॅटफॉर्म लवकरच पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाकडे सोपवण्यात येतील.



विरार-डहाणू कॉरिडोरमध्ये मोठे बदल


विरार-डहाणू रोड चौपदरीकरण प्रकल्पांतर्गत विरार रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. भविष्यात वाढणारी प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन रेल्वे सुविधांमध्ये सुधारणा करणे आणि १५ डब्यांच्या लोकलची वाढती मागणी पूर्ण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या कामांमुळे विरार-डहाणू दरम्यानचा रेल्वेचा पायाभूत आराखडा अधिक मजबूत होईल. नुकतीच पश्चिम रेल्वे आणि MRVC च्या समन्वयाने १५ डब्यांच्या लोकलची यशस्वी चाचणी (Trial Run) देखील पूर्ण झाली आहे.


विरार स्थानकावरील क्षमता वाढवण्याचे हे काम पूर्ण सेक्शनसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि प्रवासात कमीत कमी अडथळा निर्माण होईल याची काळजी घेत MRVC आणि पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे." — विलास वाडेकर, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, MRVC

Comments
Add Comment

उपनगरांचा 'वेग' वाढणार!

 'मेट्रो ९' आणि '२-बी'चे लोकार्पण; ठाणे-बोरिवली अंतर आता काही मिनिटांवर मुंबई : मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेचा

लघु उद्योगांना भूखंड शुल्कात २० टक्के सवलत

'एमएसएमई' क्लस्टरला बळ; जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय मुंबई : आखाती देशातील

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून