Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कळंबोलीत असणाऱ्या अब्दुल रशीद उर्फ बाबाजान या भोंदूबाबाने काही महिलांवर काळी जादू करण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी दोन महिलांनी या भोंदूबाबाविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत.


अब्दुल रशीद उर्फ बाबाजान लोकांना अल्लाचे महत्व पटवून देत विश्वास मिळवायचा. तर कधी काळ्या जादूची भीती दाखवायचा तसेच गोड बोलून महिलांवर छाप पाडायचा. आर्थिक, वैवाहित समस्या दूर करतो सांगून लोकांना फसवायचा. काळी जादू करण्याच्या बहाण्याने त्याने खालापूर येथे विवाहित महिलेवर अत्याचार केला.


काळी जादू करण्याचे सांगून अब्दुल रशीद महिलांना एकट्यात बोलावत होता. खालापूर येथे निर्जस्थळी बांधलेल्या फार्महाऊसवर तो महिलांना घेऊन जात होता. तसेच मध्यरात्री काळी जादू करण्याचे सांगत तो महिलांच्या अंगावरील वस्त्रे काढायला सांगायचा आणि पूजा करायला भाग पाडायचा. महिलांनी विरोध केला तर त्यांना जीवे मारण्याची धमकी देत हा भोंदूबाबा त्यांच्यावर अत्याचार करत होता.


अब्दुल रशिद उर्फ बाबाजान हा गेल्या अनेक वर्षापासून लोकांना चुना लावण्याचे काम करीत होता. गोड बोलून , आल्लातालाचे गारूड करून भक्तांना आपलस करीत होता. यामुळे महिलांबरोबर पुरूषही त्याच्या तत्वज्ञानाला बळी पडले आहेत. अनेक पुरूषांकडून त्यांने पैसे उकळलेले आहेत. सद्या दोन महिलांनी तक्रार दिली असली तरी अजून बऱ्याच महिला त्याच्या वासनेच्या शिकार झाल्याचा दावा करण्यात येतोय.

कळंबोलीत सुद्धा तो भोंदूबाबा महिलांना भेटायला बोलवायचा. समस्या दूर होतील या आशेने मोठ्या संख्येने लोक त्याला भेटायला जात होते. लोकांची वाढती गर्दी पाहून त्याला सोसायटीतून हाकलून दिले. गुन्हे दाखल झाल्यावर भोंदूने कुटंबासह पळ काढला. अब्दुल रशिद उर्फ बाबाजान हा गेल्या अनेक वर्षापासून लोकांना चुना लावत होता. त्याने महिलांसह पुरुषांचीही आर्थिक फसवणूक केली. अब्दुल रशिद उर्फ बाबाजान विरोधात दोन महिलांनी तक्रार दिली आहे. तसेच बऱ्याच महिलांवर भोंदूबाबाने अत्याचार केला असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे

मिठी नदी, नालेसफाईच्या कामांबाबत गैरप्रकार झाल्यास थेट कारवाई; महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला इशारा

मुंबई: नालेसफाईच्या संपूर्ण प्रक्रियेवर अभियंत्यांचे वैयक्तिक लक्ष असणे आवश्यक आहे. तसेच नालेसफाईच्या

महापौरांनी ओळखला भविष्यातील पाणी टंचाईचा धोका; सन २००९च्या धर्तीवर मुंबईतील सर्व विहिरी तपासा, तात्काळ वापरात आणा

मुंबई: भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी मुंबईतील सर्व सार्वजनिक, शासकीय तसेच खासगी विहिरी आणि कूपनलिकांची

Mumbai Local News Update : पश्चिम रेल्वेवर धावणार १५ डब्याच्या लोकल ; वांद्रे स्थानकावरून....

मुंबई : मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता उपनगरी रेल्वे व्यवस्थेवर