Himachal Pradesh Avalanche : अटल बोगद्याजवळ हिमस्खलन; सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही

हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळ असलेल्या अटल टनल रोहतांगच्या टोकाजवळ हिमखंड कोसळल्याची घटना घडली आहे. दोन दिवसांच्या हिमवृष्टीनंतर रविवारी (५ एप्रिल) ऊन पडताच दुपारच्या सुमारास अटल टनलच्या उत्तर पोर्टलजवळ पीर पंजाल पर्वतरांगांमध्ये हिमस्खलन झाले. हिमस्खलनाचा वेग इतका प्रचंड होता की हवेत उडणारे बर्फाचे तुकडे पर्यटकांपर्यंत पोहोचले.


पर्यटकांसाठी हे दृश्य रोमांचक ठरले; मात्र कोणी या हिमस्खलनाच्या विळख्यात सापडले असते तर मोठे नुकसान होऊ शकले असते. हिमखंड कोसळताना पाहून स्थानिकांनी शिट्ट्या वाजवत आणि आवाज करून पर्यटकांना सावध केले. रविवारी सकाळी ऊन पडताच पर्यटक फोर-बाय-फोर वाहनांमधून अटल टनल रोहतांग येथे पोहोचले होते. या हिमस्खलनात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र त्यातून उडालेला बर्फाचा प्रचंड ढग पर्यटकांपर्यंत पोहोचला.


दोन दिवसांपूर्वीच सीमा सडक संघटना (बीआरओ) यांच्या शिफारसीनुसार लाहौल-स्पीती प्रशासनाने अटल टनलच्या उत्तर पोर्टललगतच्या परिसरात पर्यटन उपक्रमांवर बंदी घातली होती. तसेच हिमखंड कोसळण्याचा इशाराही आधीच देण्यात आला होता. एप्रिल २०२६ च्या सुरुवातीला लाहौल-स्पीती तसेच मनाली परिसरातील पर्यटनस्थळांवर झालेल्या अवेळी हिमवृष्टी आणि बदलत्या हवामानामुळे लाहौल व मनाली खोऱ्यात हिमस्खलनाचा धोका वाढला आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, सतत सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे मनाली–केलंग मार्गावर हिमस्खलनाचा धोका अधिक वाढला आहे.

Comments
Add Comment

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१

Unique Grand Opening : नेते अन् अभिनेते सोडाच; सँडविच दुकानाच्या उद्घाटनाला आला चक्क 'रोबोट VVIP'! बाउन्सर अन् ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत

उज्जैन : सध्या तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, रोबोट्स केवळ कारखान्यांपुरते किंवा संशोधनापुरते मर्यादित