India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी दिलेल्या मान्यतेनुसार, आता देशातील खाजगी कंपन्या देखील 'डीआरडीओ' (DRDO) च्या तंत्रज्ञानाचा वापर करून अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची निर्मिती करू शकतील. या निर्णयाचा पुढील टप्पा म्हणून सरकार आता १५०० किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी खाजगी भागीदारांची निवड करत आहे.



दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे आता भारतातच तयार होणार


या नवीन धोरणांतर्गत, १००० ते १५०० किलोमीटर पल्ला असणारे 'लॉंग रेंज लँड अटॅक क्रूझ मिसाईल' (LRLACM) आणि १५० ते ५०० किमी पल्ल्याचे 'प्रलय' हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आता खाजगी क्षेत्रातील कंपन्यांद्वारे बनवले जाईल. डीआरडीओ (DRDO) आपले तंत्रज्ञान या कंपन्यांना हस्तांतरित करणार असून, त्यामुळे देशांतर्गत उत्पादन वाढण्यास मोठी मदत होणार आहे.



हवाई सुरक्षेसाठी अस्त्र क्षेपणास्त्रांचे उत्पादन वेगाने होणार


हवेतल्या हवेत शत्रूच्या विमानांचा वेध घेणाऱ्या 'अस्त्र मार्क-१' (११० किमी) आणि 'अस्त्र मार्क-२' (१५० किमी) या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी प्रस्ताव जारी करण्यात आले आहेत. या कामात भारतातील आघाडीच्या खाजगी आणि सरकारी कंपन्या एकत्र येऊन काम करतील. या प्रमुख क्षेपणास्त्रांच्या निर्मितीत खाजगी कंपन्यांचा सहभाग असणार आहे. भारताच्या संरक्षण क्षमतेत वाढ करण्यासाठी विविध अत्याधुनिक क्षेपणास्त्रे आणि शस्त्रप्रणाली विकसित केल्या जात आहेत. यामध्ये शत्रूचे रडार आणि संप्रेषण यंत्रणा पूर्णपणे उद्धवस्त करण्यासाठी १०० ते ३०० किमी पल्ल्याचे रुद्रम-२ आणि अँटी-रेडिएटिव्ह क्षेपणास्त्र अत्यंत प्रभावी ठरते. तसेच, मानवरहित विमानांद्वारे (ड्रोन) अत्यंत अचूक मारा करण्यासाठी ULPGM ही लहान आणि घातक क्षेपणास्त्रे वापरली जातात. शत्रूच्या धावपट्ट्या (Airfields) नष्ट करण्यासाठी १०० किमी अंतरावरून १ टनाचा दारूगोळा वाहून नेणारे स्मार्ट अँटी-एयरफिल्ड वेपन (SAAW) आणि ग्लाइड बॉम्ब तैनात केले आहेत. हवाई सुरक्षेसाठी जमिनीवरून हवेत मारा करणारी क्विक रिएक्शन आणि व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स प्रणाली ८ ते ३० किमी अंतरावरील शत्रूची विमाने, हेलिकॉप्टर आणि ड्रोन क्षणात पाडू शकते. याव्यतिरिक्त, समुद्रातील शत्रूची जहाजे नष्ट करण्यासाठी ५५ ते ३५० किमी पल्ल्याची विविध नौदल क्षेपणास्त्रे (Anti-Ship Missiles) आता खाजगी क्षेत्राच्या सहभागातून वेगाने तयार केली जात आहेत.



सामरिक क्षेत्राची दारे खाजगी कंपन्यांसाठी खुली


पारंपारिक क्षेपणास्त्र निर्मितीमध्ये खाजगी कंपन्यांना दिलेला हा प्रवेश, भविष्यात महत्त्वाच्या व मोक्याच्या (Strategic) क्षेपणास्त्र निर्मितीतही खाजगी क्षेत्राला सामावून घेण्याचे संकेत देतो. सध्या क्षेपणास्त्रांसाठी लागणारे जवळजवळ ५० हून अधिक सुटे भाग खाजगी कंपन्या आधीच पुरवत आहेत.



'आत्मनिर्भर भारता'ला मिळणार मोठी गती


या निर्णयामुळे देशात क्षेपणास्त्रांचे उत्पादन प्रचंड वेगाने वाढेल. तसेच भारताच्या खाजगी उद्योगांना प्रोत्साहन मिळून देशात संरक्षण उत्पादनांची एक मजबूत साखळी (Military Industrial Complex) तयार होईल. यामुळे भारताचे परकीय संरक्षण उपकरणांवरील अवलंबित्व कमी होऊन 'आत्मनिर्भर भारत' स्वप्नाला मोठी ताकद मिळणार आहे.

Comments
Add Comment

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१

Unique Grand Opening : नेते अन् अभिनेते सोडाच; सँडविच दुकानाच्या उद्घाटनाला आला चक्क 'रोबोट VVIP'! बाउन्सर अन् ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत

उज्जैन : सध्या तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, रोबोट्स केवळ कारखान्यांपुरते किंवा संशोधनापुरते मर्यादित

US Visa Interview : अमेरिका जाण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; व्हिसा इंटरव्ह्यू अपॉइंटमेंटवर अनिश्चित काळासाठी ब्रेक

नवी दिल्ली : अमेरिकेला जाण्याचे नियोजन करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे