Chhatrapati Sambhajinagar Crime : एन-६ सिडको परिसरात मध्यरात्री गोळीबार; तरुण पुरोहिताने स्वतःच्याच डोक्यात...

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिडको एन-६ परिसरातील साईनगर येथे काल रात्री उशिरा गोळीबाराची एक थरारक घटना घडली. ३१ वर्षीय समीर नाईक या तरुणाने राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडून घेतल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गोळी कानाजवळून डोक्याच्या आरपार गेल्याने समीरची प्रकृती अत्यंत गंभीर असून, त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



नेमकी घटना काय?


समीर नाईक हा आपल्या आई आणि लहान भावासोबत साईनगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. तो व्यवसायाने पौरोहित्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. घटनेच्या दिवशी सायंकाळी समीरची आई बजरंग चौकातील आपल्या बांगड्यांच्या दुकानात गेली होती. घरात समीर एकटाच असताना हा धक्कादायक प्रकार घडला. रात्री उशिरा जेव्हा समीरचा लहान भाऊ घरी परतला, तेव्हा त्याला समीर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता आणि शेजारीच एक पिस्तूल पडलेले आढळून आले.



नैराशातून पाऊल उचलल्याचा संशय


">घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासानुसार, समीरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोलिसांना दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि भांगेच्या गोळ्या आढळून आल्या आहेत. ३१ वर्षांचा होऊनही अद्याप लग्न न झाल्यामुळे समीर गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता, अशी माहिती समोर येत आहे. याच नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.



पोलीस तपास सुरू


या घटनेबाबत माहिती देताना सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी सांगितले की, "घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक पोहोचले असून तपास सुरू आहे. समीरने वापरलेले पिस्तूल बेकायदेशीर आहे की अधिकृत, तसेच यामागे अन्य काही कारण आहे का, याचा शोध घेतला जात आहे." समीरच्या या कृत्यामुळे परिसरात दहशतीचे आणि हळहळीचे वातावरण पसरले आहे. रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, समीरची प्रकृती अद्यापही चिंताजनक असून डॉक्टर त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

Tags
crime newsChhatrapati Sambhajinagar crime
Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व