सोलापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा कहर

सोलापूर : यंदाच्यावर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट कहर केला असून, मार्च महिन्यातील पाच दिवस गारपीट आणि अवकाळी पाऊस पडला आहे. यात महसूल प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार 2439.05 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


द्राक्ष, गहू, आंबा, डाळिंब यासारख्या नगदी पिकांचा नुकसानीत समावेश आहे. सध्या ग्लोबल वॉर्मिंगचा समस्या निर्माण झाल्याने वातावरणात सातत्याने बदलत आहे. कधी अधिवृष्टी तर कधी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडत आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने महापूर व अतिवृष्टी झाली. आता यंदाच्या वर्षी देखील गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकरी बेजार झाले आहेत. या गारपीटीचा फटका जिल्ह्यातील 170 गावांना बसला असून त्यातून 3423 शेतकरी बाधित झाले आहेत. यात 264.7 हेक्टर वरील जिरायती पिके तर 830.75 हेक्टर वरील बागायती पिकांची नुकसान झाली आहे.


फळ पिकाच्या सर्वाधिक नुकसान झाले असून यात 1343.6 हेक्टर क्षेत्रावरील क्षेत्रावरील फळपिकांचा समावेश आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील आठ गावांना गारपिटीचा तडाका बसला असून, 429 शेतकरी बाधित झाले आहेत. त्यात द्राक्षे, आंबा, केळी, खरबूज, ढोबळी मिरची, ज्वारी हरभरा, गहू, डाळिंब यासारख्या 227.45 हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नुकसान झाली आहे.

Comments
Add Comment

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम

Ashish Shelar : गडकिल्ले, ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला गती; मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा

CM Devendra Fadnavis : 'दहीहंडी'च्या ऑलिम्पिकमधील समावेशासाठी प्रयत्न करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; वरळीत दिमाखात पार पडले 'प्रो-गोविंदा' लीगचे उद्घाटन मुंबई :