भोंदूबाबा अशोक खरातने हवालाद्वारे पाच देशांत पाठवले हजारो कोटी?, रोहित पवारांचा गंभीर आरोप

मुंबई : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी कोठडीत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्याभोवतीचा चौकशीचा फास अधिक घट्ट होत चालला असून, आता या प्रकरणाला आंतरराष्ट्रीय 'मनी लाँड्रिंग'चे वळण मिळाले आहे. अशोक खरातने ऑस्ट्रेलिया, दुबईसह पाच देशांमध्ये हवालामार्फत हजारो कोटी रुपये पाठवल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी केला आहे. हे प्रकरण एका भोंदूबाबापुरते मर्यादित नसून, ते एका मोठ्या 'नेक्सस'चा भाग असल्याने याची केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) केली जात आहे.


रोहित पवार म्हणाले, "अशोक खरात याने भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांचे हजारो कोटी रुपये हवालामार्फत परदेशात वळवले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि दुबईसह अन्य चार-पाच देशांमध्ये हे पैसे पाठवण्यात आले असून, हे प्रकरण देशाच्या सुरक्षेला आव्हान देणारे आहे. राज्य सरकारकडे यासंदर्भात पुरेसे पुरावे आले असतील, तर गृह विभागाने या प्रकरणाचा वापर राजकीय गोळाबेरजेसाठी करू नये. उलट, राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न विचारात घेऊन याची सखोल चौकशी करावी. या प्रकरणात आता तरी ईडीसारख्या यंत्रणांना जाग येईल का?" असा खोचक सवालही त्यांनी केला.

Comments
Add Comment

Jyotiba Shravan Shashti Yatra 2026 : श्री ज्योतिबा श्रावण षष्ठी यात्रेला २ लाख भाविकांची उपस्थिती

कोल्हापूर : वाडी रत्नागिरी म्हणजे जोतिबा डोंगर येथील श्री ज्योतिबा श्रावण षष्ठी यात्रेला यंदा भाविकांचा

Maharashtra Anti-Conversion Act : 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य' कायद्याची रक्षाबंधनापासून अंमलबजावणी

- महायुती सरकारची लाडक्या बहिणींना विशेष भेट; १० वर्षांपर्यंत कारावास, ७ लाखांचा दंड, धर्मांतराच्या उद्देशाने

Beed Crime : सीझर झालं, गोंडस बाळाचा जन्मही झाला पण... आईच्या पोटात अशी काही वस्तू राहिली की सगळ्यांनाच धक्का बसला

Beed : बीड जिल्हा रुग्णालयात घडलेला एक प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे. बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय

Eknath Shinde : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मधील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाला ५० कोटी देण्याचा निर्णय

प्रत्यक्ष स्मारकाच्या कामाला गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई : बुलडाणा

Anand Bansode : आनंद बनसोडे यांची ऑस्ट्रेलियाच्या माऊंट कोसिअस्कोवर तिसऱ्यांदा यशस्वी चढाई

पुणे : ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर माऊंट कोसिअस्कोवर ३६० एक्स्पलोररचे संस्थापक एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे

Prakash Abitkar : सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित, उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

सर्पदंशाची प्रत्येक घटना, विषप्रतिबंधक लसीचा साठा, केलेले उपचार व मृत्यूची माहिती होणार नोंदबद्ध मुंबई :