Akola Crime News : अकोला हादरलं! 'धुरंधर' सिनेमा पाहून आले अन् दिवसाढवळ्या तिघांवर सपासप वार

अकोला : नांदेडमधील तिहेरी हत्याकांड ताजे असतानाच आता अकोला शहरातही तशीच धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील कौलखेड भागात 'धुरंधर २' हा चित्रपट पाहून आलेल्या नशेखोर तरुणांच्या एका टोळीने दिवसाढवळ्या धुमाकूळ घालत तिघांवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मृत्यूशी झुंज सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण अकोला शहरात भीतीचे सावट पसरले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.



नेमकी घटना काय?


मिळालेल्या माहितीनुसार, कौलखेडमधील श्रद्धानगर ३ परिसरात ही घटना घडली. नशेच्या धुंदीत असलेल्या या टोळीने हातात चाकू आणि लोखंडी पाईप घेऊन परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. अभिलाष अरविंद हिंगे (३२) यांच्यावर या टोळीने अमानुष हल्ला केला, ज्यात ते गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर या टोळीने आपला मोर्चा कौलखेड चौकाकडे वळवला आणि तिथे रवी उर्फ छोटू ठाकरे (२४) या तरुणावरही चाकूने हल्ला केला. या टोळीचा हैदोस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून तो थरार पाहून अंगावर काटा येतो.



पोलिसांची कारवाई आणि संताप


घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. मात्र, खदान पोलिसांच्या दुर्लक्षित धोरणामुळेच गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. नांदेडमध्येही 'धुरंधर' चित्रपट पाहून आलेल्या तरुणांनी तिघांची हत्या केल्याची घटना घडली होती, त्याच धर्तीवर अकोल्यातही ही घटना घडल्याने या चित्रपटाचा तरुणांवर होणारा परिणाम चिंतेचा विषय ठरत आहे.

Comments
Add Comment

Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील खड्डे बुजवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; प्री-कास्ट पॅचने दुरुस्तीला सुरुवात

पुणे : चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवर आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने

Ahilyanagar Crime : गौण खनिज माफियांवर कारवाईचा हातोडा, अहिल्यानगरमधील ६३ क्रशर सील

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर तालुक्यातील खडीकरण केंद्रांवर महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील सर्व ६३

Pune RTO : पुणेकरांसाठी मोठी बातमी! ‘MH 12’ ची जागा आता ‘MH 61’ घेणार? वाहनांच्या नंबरबाबत मोठा बदल

पुणे : पुणेकरांची खास ओळख बनलेली ‘MH 12’ वाहन क्रमांक मालिका आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. पुण्यात वाहनांची

Chhatrapati Sambhajinagar Suicide : 'तुला Iphone 15 Pro देतो, खाली ये बाळा'... डोंगराच्या कड्यावरून आई-वडिलांची आर्त हाक

डोंगरावर गेला, 3 तास कड्यावर उभा राहिला; उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही अंत छत्रपती संभाजीनगर :

Maharashtra Weather Alert : श्रावणसरी गायब! महाराष्ट्रावर पावसाचे संकट; पुढील काही दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज

मुंबई : ऑगस्ट महिन्याचा अर्ध्याहून अधिक कालावधी संपला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक

11th Admission Special Round : इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची विशेष फेरी सुरु; संपूर्ण वेळापत्रक जाहीर

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित न