शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेतून नव्या पिढीला ऊर्जा व दिशा मिळेल - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील विधानभवन परिसरात त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.


यावेळी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना आजही अत्यंत प्रेरणादायी आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांना शक्ती व बळ मिळावे, तसेच तुळजाभवानीचे आशीर्वाद लाभावेत, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.


विधानमंडळात थोर विभूतींच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्याची परंपरा सातत्याने जपली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान व्यक्तींच्या कार्याची आठवण करून देणारे हे क्षण समाजाला नवी दिशा देणारे ठरतात, असे त्या म्हणाल्या.


यावेळी विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, खासगी सचिव अविनाश रणखांब, विशेष कार्यकारी अधिकारी संतोष उडतेवार तसेच विधिमंडळ कर्मचारी उपस्थित होते.


छत्रपती शिवाजी महाराजांचे पुण्यस्मरण महाराष्ट्रासह देश-विदेशात मोठ्या प्रमाणात होत असून, त्यांच्या कार्यातून पुढील पिढ्यांना प्रेरणा, ऊर्जा आणि स्फूर्ती मिळत राहील, असा विश्वासही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

दहिसर मेट्रो आणि पॉड टॅक्सीच्या उदघाटनाची तारीख ढकलली, काय आहे कारण ?

मुंबई : मुंबईच्या लोकलवरचा भार कमी व्हावा आणि नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी

शाळांना 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल' नाव वापरण्यास मज्जाव!

राज्य सरकारचा मोठा निर्णय; पालकांची दिशाभूल थांबवण्यासाठी निर्बंध मुंबई : आपल्या पाल्याला 'आंतरराष्ट्रीय'

मुंबईतील प्रलंबित एलआयसी इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार, शेकडो कुटुंबांना दिलासा

कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांची

'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया'

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक मुंबई : भारतरत्न

कोरोनावर लस तयार करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एका पेंटिंगमुळे चर्चेत

मुंबई : शहरात पार पडलेल्या एका भव्य कला लिलावाने कला विश्वासह उद्योग क्षेत्रातही मोठी चर्चा रंगवली आहे. एका

Seven Hills Hospital: सेव्हन हिल्स रुग्णालयाचे खासगीकरण?; रुग्णालय पूर्णपणे महापालिकेच्या ताब्यात घेण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या चालवण्यात येणारे सेव्हन हिल्स रुग्णालय हे आता खासगी संस्थेच्या ताब्यात