दहिसर मेट्रो आणि पॉड टॅक्सीच्या उदघाटनाची तारीख ढकलली, काय आहे कारण ?

मुंबई : मुंबईच्या लोकलवरचा भार कमी व्हावा आणि नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी महाराष्ट्र सरकारने दोन नव्या मेट्रो मार्गिकेची घोषणा केली. एप्रिलच्या सुरुवातीला या मार्गिकांचे उद्घाटन होणार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या. पण हे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले आहे.



मुंबईतील २ नव्या मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन गेले पुढे


मुंबईतील दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो ९ आणि अंधेरी ते मंडाले ( मानखुर्द ) मेट्रो २बी या दोन महत्वाच्या मार्गिकांचे उद्घाटन होणार होते. दोन्ही मार्गिकांचे काम पूर्ण झाले असून गेले काही दिवस निवडणूक आचारसंहिता आणि इतर प्रशासकीय कामांमुळे उद्घाटन शक्य झाले नव्हते.



ठाणे - बोरिवली बोगदा


तसेच ठाणे - बोरिवली हा प्रकल्प लवकरच उभारण्यात येणार आहे. ठाणे ते बोरिवली या मार्गावर प्रवास करताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, पण बोगदा सुरू झाल्यानंतर ठाणे आणि बोरीवली दरम्यानचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होऊन वाहतूक कोंडीचा त्रास ही कमी होणार आहे. ३ एप्रिलला भूमिपूजन करून ठाणे-बोरिवली बोगद्याच्या खोदकामालाही सुरुवात होणार होती. मात्र तो ही कार्यक्रम आता पुढे ढकलण्यात आला आहे.



पॉड टॅक्सीचे भूमिपूजन


वांद्रे ते कुर्ला दरम्यान सुमारे ८.८ किमी लांबीचा पॉड टॅक्सीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन आणि पॉड टॅक्सीचे भूमिपूजन ३ एप्रिल रोजी होणार होते. पण सध्या सत्तेतील सर्व प्रमुख मंत्री पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारात गुंतले आहेत.

केरळ, आसाम, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तामिळनाडू या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. देशातील अनेक प्रमुख नेते या राज्यांचे धावते दौरे करत आहेत आणि प्रचारसभा, रोड शो यात गुंतले आहेत. यामुळेच मेट्रोचे उद्घाटन आणि पॉड टॅक्सीचे भूमिपूजन लांबणीवर पडले आहे. लवकरच नव्या तारखेची घोषणा होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

Comments
Add Comment

BMC Ganesh Utsav Guidelines : गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य? मुंबई महापालिकेने स्पष्ट केली भूमिका

Rustomjee Crown Unauthorized Construction : प्रभादेवीतील 'रुस्तमजी क्राउन’ इमारतीतील अनधिकृत बाधकामांवर महापालिकेचा हातोडा

- दोन दिवसांमध्ये १० सदनिकांच्या वाढीव बांधकामावर कारवाई - तब्बल १२८ सदनिका धारकांना नोटीस ; तब्बल महिनाभर सुरू

Tree Adoption Scheme : मुंबईत राबवली जाणार वृक्ष दत्तक योजना; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत नागरिक गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था व शैक्षणिक संस्थांच्या सहभागातून आणि

Mumbai Water Stock : मुंबईचा पाणी साठा ९५ टक्के; मुंबई आता सुरक्षित कक्षेत

- पाणीकपात रद्दचा निर्णय १ ऑक्टोबर नंतरच मुुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील

Bhuleshwar Cha Raja : भुलेश्वरच्या राजा मूर्ती दुर्घटनेचा तपास सुरू; शिल्पकार अनिकेत देसाईंचा पोलिसांनी नोंदवला जबाब

मुंबई : मुंबईतील भुलेश्वरच्या राजा गणेश मूर्तीच्या आगमन सोहळ्यादरम्यान मूर्ती कोसळून दोन मंडळ पदाधिकाऱ्यांचा

Coastal Road-Sea Link Traffic Rules : मुंबईतील कोस्टल रोड आणि सी-लिंकवर वाहतूक निर्बंध; 'या' वाहनांना कायमस्वरुपी बंदी

मुंबई : मुंबईतील धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्ग (कोस्टल रोड) आणि राजीव गांधी