Seven Hills Hospital: सेव्हन हिल्स रुग्णालयाचे खासगीकरण?; रुग्णालय पूर्णपणे महापालिकेच्या ताब्यात घेण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या चालवण्यात येणारे सेव्हन हिल्स रुग्णालय हे आता खासगी संस्थेच्या ताब्यात देण्याचा घाट असून या रुग्णालयाचे खासगीकरण करण्यात येवू नये. त्यामुळे यासाठी मुंबईकरांना चांगल्याप्रकारची आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यासाठी महापालिकेच्या ताब्यात घेवून त्याचा विकास एम्सच्या धर्तीवर करण्यात यावा अशी मागणी स्थायी समितीत करण्यात आला आहे.


स्थायी समितीच्या बैठकीत काँग्रेस नगरसेवक अश्रफ आझमी यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे या प्रश्नाला वाचा फोडत हे रुग्णालय खासगी संस्थेच्या ताब्यात देण्याचा डाव प्रशासनाचा असल्याचा आरोप केला.अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णलयाची सरकारी मूल्यानुसार ५ हजार कोटी तर बाजार भावानुसार ७ हजार कोटी रुपये किंमत आहे. एनसीएलटी प्रक्रियेअंतर्गत झालेल्या समझोत्यानंतर, रिलायन्सचे मुकेश अंबानी यांच्याशी संबंधित असलेल्या खाजगी कॉर्पोरेट संस्थेकडे सोपवले जाऊ शकते. “जर खाजगी अधिग्रहणासाठी ४७६ कोटी रुपये उभे केले जाऊ शकतात, तर महानगरपालिका सार्वजनिक आरोग्यसेवेसाठी हे रुग्णालय ताब्यात घेण्यासाठी तीच रक्कम का वापरू शकत नाही?” “जेव्हा मुंबईकर रुग्णालयातील खाटांच्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत, तेव्हा कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्यासाठी सार्वजनिक पैशाचा वापर करु नये.”


हे रुग्णालय सार्वजनिक जमिनीवर उभे आहे, १५०० खाटा, ३६ ऑपरेशन थिएटर्स, १२० बाह्यरुग्ण विभाग आहेत आणि तरीही, गरीब जनतेची सेवा करण्याऐवजी, ते खाजगी नियंत्रणाखाली उभे केले जात आहे. सेव्हन हिल्सच्या हस्तांतरणाची घाई का केली जात आहे. महानगरपालिका मुंबईकरांसाठी काम करत आहे की कॉर्पोरेट कंपन्यांसाठी? मुंबईत एका अद्ययावत रुग्णालयाची गरज आहे, मुंबईतील सरकारी व बीएमसीची रुग्णालयाची अवस्था अत्यंत बिकट आहे, रुग्णांच्या नातेवाईकांना खाटांसाठी धावपळ कराली लागते अशावेळी एक अद्ययावत जागतिक दर्जाचे रुग्णालय खाजगी लोकांच्या घशात का घातले जात आहे असा आरोप अशरफ आझमी यांनी केला आहे.


सेव्हनहिल्स रुग्णालय उद्योगपतीच्या घशात घालण्याचे षडयंत्र दिसत असून कोणत्याही परिस्थितीत या रुग्णालयाचे खाजगीकरण करू नये. मुंबईकरांना चांगल्या व दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने हे रुग्णालय ताब्यात घेऊन चालवावे, आणि वैद्यकीय, नर्सिंग आणि संशोधन सुविधांसह त्याचा एम्स पातळीवर याचा विकास करावा, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी केली आहे. त्यामुळे याची संपूर्ण माहिती देण्यात यावी असे निर्देश देत हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.

Comments
Add Comment

MLA Nilesh Rane : आनंदाची बातमी, गणेशभक्तांसाठी १२ सप्टेंबरला धावणार शिवसेना एक्सप्रेस

मुंबई : कोकणात राहणाऱ्यांसाठी गणेशोत्सव आणि शिमगा अर्थात होळी हे दोन अतिशय महत्त्वाचे सण. नोकरी व्यवसायाच्या

Mumbai Anti-Narcotics Cell : मुंबईत ९ कोटी ४८ लाखांचे मेथॅम्फेटामाइन जप्त; अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत मुंबई आणि ग्रेटर

Kurla Landslide : कुर्ला-राजावाडी रुग्णालयातील मृतांचा आकडा वाढला; आणखी एका तरुणाचा मृत्यू

मुंबई : कालच्या घटनेनंतर जखमी आणि मृतांची संख्या अद्ययावत करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1.15 वाजता

New AC Local : २०२९-३० पर्यंत मुंबईच्या सर्व लोकल एसी होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; द्वितीय श्रेणीचे तिकीट वाढवणार नाही मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेचे

GeM : जेमच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची दुहेरी बाजी; पंचायतस्तरीय खरेदीतील उत्कृष्टतेसह सर्वाधिक खरेदी मूल्यासाठी महाराष्ट्राचा गौरव

मुंबई : शासकीय ई-बाजारपेठ अर्थात जेमच्या दशकपूर्तीनिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित ‘हॉनरिंग एक्सलन्स’ पुरस्कार

One-day Seminar : ‘पडद्यावरचा सिनेमा, पडद्यामागचं गणित’ या विषयावर रंगणार एकदिवसीय परिसंवाद

महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या