गडबड कराल तर पस्तावाल असा धडा शिकवू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

नवी दिल्ली : आपले शेजारी सध्या अशा स्थितीत आहेत की ते काहीतरी आगळीक करु शकतात. त्यांनी असे केल्यास भारताकडून जोरदार आणि तीव्र स्वरुपाचे उत्तर दिले जाईल. ऑपरेशन अद्याप समाप्त झालेले नाही. काही आगळीक करण्याचा प्रयत्न केल्यास जोरदार प्रत्त्युत्तर दिले जाईल, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे. मध्यपूर्वेत सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी शेजाऱ्यांना इशारा दिला. ऑपरेशन सिंदूर अजून सुरु असल्याचेही त्यांनी नमूद केले. सिंह यांनी यावेळी भाषणात थेट कोणत्याही देशाचे नाव घेण्याचे टाळले.


केरळममध्ये आयोजित सैनिक सन्मान संमेलन कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते. इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना भारतीय नौसेना सुरक्षितपणे बाहेर काढून देशात आणत आहे. देशात इंधन तुटवडा असल्याचा दावा राजनाथ सिंह यांनी खोडून काढला. मध्यपूर्वेतील संघर्षावरुन काहीजण विनाकारण अफवा पसरवून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही सिंह म्हणाले. देशात पेट्रोल, डिझेल किंवा गॅसचा तुटवडा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधक इंधन, तेल या विषयावरुन राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या कठीण काळात देशाबरोबर उभं न राहता ते राजकारण करत असल्याचे सिंह म्हणाले. “मध्यपूर्वेत संघर्ष सुरु असल्याने हा काळ थोडा आव्हानात्मक आहे. केरळममधील अनेक लोक या भागात काम करतात पण, त्यांच्या सुरक्षेची काळजी सरकार घेत आहे, त्यामुळे अधिक काळजी करु नये, असे राजनाथ सिंह म्हणाले.

Comments
Add Comment

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे

Rajnath Singh : ‘रक्तदान करणारे योद्धे’, राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक!

नवी दिल्ली : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदाते योद्धे आहेत,

Indian fishermen in Pakistan : पाकिस्तानच्या तुरुंगात १९८ भारतीय मच्छीमार अद्याप बंदिस्त

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानच्या समुद्रसीमेवर मासेमारी करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या आरोपावरून

Jharkhand Exam Scam : झारखंडमध्ये परीक्षांमधील अनियमिततेवर तिढा कायम

नवी दिल्ली : झारखंडमध्ये परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेला वाद आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन