महाराष्ट्रात ई वाहनांना चालना देण्यासाठी कोट्यवधींच्या निधीचे वितरण

मुंबई : राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवून पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण-२०२५ अंतर्गत विविध घटकांना प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.


शासकीय निर्णयानुसार, ई-वाहनांच्या मागणीला चालना देण्यासाठी उत्पादक कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर अनुदान देण्यात आले आहे. यात Bajaj Auto Ltd., Mahindra Electric Mobility Ltd. आणि Euler Motors Pvt. Ltd. यांना तीन चाकी वाहनांसाठी एकूण ₹२.५१ कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, राज्यातील प्रमुख शहरी वाहतूक उपक्रमांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. BEST (मुंबई), नागपूर महानगरपालिका (NMT), पुणे महानगरपालिका (PMPL), कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका (NMMT) आणि ठाणे महानगरपालिका (TMT) या सहा उपक्रमांना मिळून ₹४.५५ कोटींचा निधी देण्यात आला आहे. यामुळे शहरांमध्ये सार्वजनिक ई-वाहतूक अधिक सक्षम होणार आहे. याशिवाय, Ather Energy Pvt. Ltd., TVS Motor Co., Chetak Technology आणि इतर कंपन्यांना ई-दुचाकी व ई-तीनचाकी वाहनांसाठी एकूण ₹४.४५ कोटींपेक्षा अधिक प्रोत्साहन रक्कम वितरित करण्यात येणार आहे. हा निधी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच सन. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी २४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


शासनाच्या निर्णयामुळे राज्यातील ई-वाहन क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, प्रदूषण कमी करण्यास मदत होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.

Comments
Add Comment

आनंदाची बातमी, पावसाळ्याआधी हे उड्डाणपूल सुरू होणार, मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार

मुंबई : राज्याच्या राजधानीतील वाहतूक कोंडीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. मुंबईतील सात उड्डाणपुलांचे काम

अवैध प्रवासी वाहतुकीवर आळा घालण्यासाठी कडक भूमिका घेणार - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : राज्यातील वाढत्या अवैध प्रवासी वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या

Nitish Kumar: नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरही झेड+ सुरक्षा राहणार; नेमकं कारण काय?

नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्रीपद

BMC News : मुंबईतील सर्व ऑक्सिजन प्लांटचे ऑडीट करा; स्थायी समितीने दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) कोविड काळात मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये तसेच कोविड

BMC News : वाणीतून नाहीतर भाजपाने करून दाखवले; सुमारे २७० कोटी रूपयांची बचत करत गारगाई पाणी प्रकल्पाला दिली मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) स्थायी समितीने फेरविचारासाठी पाठवून दिलेला गारगाई पाणी प्रकल्पाला अखेर स्थायी समितीने

मुंबईतील १९८५ ते २०२५ पर्यंतच्या आरक्षित वास्तूंचा शोध घ्या, कागदपत्रे तपासा; महापौरांचे प्रशासनाला आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सार्वजनिक सुविधा, समाज कल्याण केंद्र, निवासी आरक्षण असलेल्या महानगरपालिकेच्या वास्तू,