BMC News : मुंबईतील सर्व ऑक्सिजन प्लांटचे ऑडीट करा; स्थायी समितीने दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


कोविड काळात मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये तसेच कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले होते. मात्र, मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत भविष्याची ही गरज ओळखून हे प्लांट सुुरु केले असले तरी प्रत्यक्षात प्लांट रुग्णालयात आहेत का असा सवाल करत स्थायी समितीने यापूर्वी बसवलेल्या ऑक्सिजन प्लांटचे ऑडीट करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार स्थायी समितीने प्रशासनाला याबाबतचे निर्देश दिले आहेत.


मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयात द्रवरुप मेडिकल ऑक्सिजन वायूचा पुरवठा करण्याचा प्रस्ताव मंजुरीला असता काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी २०२०-२१ पासून ऑक्सिजन वायूचा पुरवठा केला जात असून आतापर्यंत हा पुरवठा सुरु आहे, मग वारंवार या कंपनीला मुदतवाढ का दिली जाते असा सवाल केला. कोविड काळात प्रत्येक ठिकाणी सुमारे ५० कोटी रुपये खर्च करून ऑक्सिजन प्लांट उभारले त्याची आजची स्थिती काय आहे. त्यामुळे याची चौकशी करण्याची मागणी करत आझमी यांनी केली. यावर भाजपच्या शितल गंभीर यांनी सन २०२१ पासून सन २०२५ पर्यंत हे कंत्राट वाढवून देण्यात येत आहे. पण यातील जानेवारी ते मे २०२५ या कालावधीमध्ये केईएम, शीव आणि नायरमध्ये अतिरिक्त पुरवठा करावा लागला. त्यामुळे या अतिरिक्त वापराचे कारण काय याचा खुलासा करण्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ सईदा खान यांनी कोविड काळात ऑक्सिजन प्लांट होते, त्यांचे काय झाले आणि आज त्यांचे काय झाले अशी विचारणा यासर्व ऑक्सिजन प्लांटचे ऑडीट करण्याची मागणी केली.


तर एमआयएमचे जमीर कुरेशी यांनी काही तांत्रिक बाबींकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आणि अमेय घोले यांनी रेसकोर्सवरील कोविड सेंटरमधील ऑक्सिजन प्लांटचा विषय गंभीर आहे. त्यामुळे याचे ऑडीट व्हायलाच हवे. ऑक्सिजन प्लांटसाठी किती प्रावधान आहेत आणि किती ऑक्सिजन प्लांट आहे, हे सर्व प्रथम समोर यायला हवे असे सांगितले.त्यामुळे सदस्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात यावी असे निर्देश देत स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा