'मराठी माणसाच्या असंख्य आठवणींचे गाठोडे म्हणजे भारतमाता'

मुंबई : लालबाग, परळ आणि गिरणगावातील असंख्य मराठी माणसाच्या आठवणींचे एक मोठे गाठोडे घेऊन भारतमाता सिनेमागृह उभे आहे. सरकार म्हणून त्याचे आम्ही जतन करण्याचे पुर्ण प्रयत्न करीत आहोत, आपण सगळ्यांचे पाठबळ असू द्या, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी केले. मराठी सिनेमाचे माहेर घर अशी ओळख असलेल्या लालबागच्या नाक्यावरील भारतमाता सिनेमागृहाचा डागडुजीनंतर आज पुन्हा राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पडदा उघडला. झी टॉकीज निर्मित " सुपर डूपर" सिनेमाच्या शुभारंभाचा प्रयोगाच्या निमित्ताने हा उद्घाटन सोहळा पार पडला. दादासाहेब फाळके चित्रनगरीचे सह व्यवस्थापक प्रशांत साजणीकर, अभिनेत्री निर्मिती सावंत, ऋषिकेश जोशी, लेखक समीर पाटील, निर्माते विजय शिंदे यांच्या सह सुपर डूपरचे कलाकार यावेळी उपस्थित होते.





माझे आजोळ लालबाग असल्याने मी आई सोबत या सिनेमागृहात सिनेमा पाहिला त्याच्या आठवणी आज ताज्या झाल्या. आज माझ्या सारख्या असंख्य मराठी माणसाच्या आठवणी या सिनेमागृहाशी जोडलेल्या आहेत. हा नका सुध्दा चळवळी आणि आंदोलनाचे केंद्र होते. या भारतमाता मध्ये उभा असताना मोठा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो आहे. आज एक पडदा सिनेमागृह चालवणे आव्हान आहे अशावेळी आम्ही सरकार म्हणून उभे आहोतच पण मराठी प्रेक्षकांनी सुध्दा या सिनेमागृहाच्या पाठीशी उभे रहायला हवे. रंगमंच्या जागेचे नियोजन जमले तर सरकारचा चित्रपट पुरस्कार सोहळा सुध्दा आम्ही याच सिनेमागृहात घेऊ, असेही मंत्री शेलार यांनी घोषीत केले.


या ऐतिहासिक सिनेमागृहाचे पुनरुज्जीवन वन सिनेमाज यांनी केले असून, मुक्ता A2 सिनेमाज यांच्या सहकार्याने सिंगल स्क्रीन सिनेमाचा अनुभव पुन्हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे. नवीन भारतमाता सिनेमा आता डॉल्बी सराउंड साउंड, 2K लेझर प्रोजेक्शन, लक्झरी रीक्लायनर्स आणि सोफा सीटिंग तसेच सुधारित खाद्यपदार्थ सुविधा अशा आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना अधिक मोठा आणि उत्कृष्ट सिनेमाचा अनुभव मिळेल. तांत्रिक सुधारणा करताना सिनेमाचा वारसा आणि त्याची ओळख कायम ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Bigg Boss Marathi 6 : शेवटची कॅप्टनसी कोणाला मिळणार ? प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन यंदा अनेक गोष्टींमुळे सतत चेर्चेत आहे. आता या सीझनचे काही दिवसच शिल्लक राहिले असून बिग

Dhurandhar 2 : 'धुरंधर २' मध्ये जेमतेम एक सेकंदाची भूमिका, तरीही सोशल मीडियात प्रचंड चर्चा

मुंबई : आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर २ अर्थात 'धुरंधर द रिव्हेंज' हा सिनेमा १९ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित झाला.

Bhoot Bangla :अक्षय कुमार आणि एकता कपूरचा मोठा डाव! लवकरच बहुप्रतिक्षित ‘भूत बंगला’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मुंबई : ‘भूत बंगला’ (Bhoot Bangla) सिनेमाबाबतची उत्सुकता सातत्यानं वाढत आहे. याच्या रोचक झलक आणि गाजलेल्या गाण्यांनी आधीच

Hrithik Roshan Divorce : 'या' कारणामुळे हृतिक आणि सुझाननं घेतला घटस्फोट, अभिनेता जायेद खाननं केला खुलासा

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) नुकताच पुतण्याचा लग्नातील डानसमुळे चर्चेत आला होता. हृतिक

Sourav Ganguly Biopic : लवकरच 'सौरव गांगुली'चा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार, मुख्य भूमिकेत झळकणार 'हा' अभिनेता

मुंबई : भारतीय क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू सौरव गांगुलीच्या जीवनावर आधारित ‘दादा’ या बहुप्रतीक्षित

Sonali Bendre : अभिनेत्री सोनाली बेंद्रे अडचणीत, पुण्यातील मावळच्या शेतकऱ्यानं केले गंभीर आरोप

मुंबई : अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे (sonali Bendre) आणि तिचे