महाराष्ट्राच्या जीएसटी महसुलात १२.६ टक्क्यांची वाढ

मुंबई : वित्तीय वर्ष २०२५-२६ दरम्यान महाराष्ट्र राज्य जीएसटी विभागाने उल्लेखनीय महसूल कामगिरी नोंदवली आहे. वस्तू व सेवा कर (GST), मूल्यवर्धित कर (VAT) आणि व्यवसाय कर (PT) यांमधून एकूण २,५१,२५६ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला असून, मागील वर्षाच्या २,२३,०८७ कोटी रुपयांच्या तुलनेत १२.६ टक्के वाढ झाली आहे.


राज्यांमधील जीएसटी महसूल संकलनात महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान पटकावले असून, दुसऱ्या क्रमांकाच्या राज्याच्या तुलनेत येथील महसूल दुपटीपेक्षा अधिक आहे. तसेच, राज्यातील जीएसटी महसूल वित्तीय वर्ष २०२४-२५ च्या तुलनेत १४.६ टक्क्यांनी वाढून १,८६,९९१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.


राज्याच्या मजबूत अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंब म्हणून जीएसटी महसुलातील ही वाढ देशातील उच्च वाढ दरांपैकी एक असून, ती राष्ट्रीय सरासरीपेक्षा जवळपास दुप्पट आहे. जीएसटी, व्हॅट आणि व्यवसाय कर मिळून महाराष्ट्राच्या राज्याच्या स्वमालकीच्या कर महसुलात (SOTR) सुमारे ६४ टक्के योगदान देतात, यावरून राज्य जीएसटी विभागाची वित्तीय बळकटीत असलेली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित होते.


विभागाने सलग चौथ्या वर्षी आपला अर्थसंकल्पीय अंदाज (BE) ओलांडत १००.२ टक्के लक्ष्य साध्य केले आहे. जीएसटी दर संयुक्तिकरणामुळे निर्माण झालेल्या काही अडचणींनंतरही विभागाने सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सुधारित अनुपालनाच्या जोरावर या आव्हानांवर मात करत १४.६ टक्क्यांची भक्कम वाढ नोंदवली आहे. जीएसटी व्यवस्थेअंतर्गत झालेली ही मजबूत वाढ दर संयुक्तिकरणानंतर वाढलेल्या देशांतर्गत उपभोगामुळे तसेच कर प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शक्य झाली आहे.


महाराष्ट्र राज्य जीएसटी विभागाने डेटा-आधारित अभिप्राय यंत्रणा, प्रगत विश्लेषणावर आधारित अंमलबजावणी, उच्च जोखमीच्या करदात्यांवर अधिक लक्ष, तसेच प्रामाणिक करदात्यांसोबत सातत्यपूर्ण संवाद यांसारख्या विविध सुधारणा उपाययोजना राबवल्या आहेत. यासोबतच, ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ (Ease of Doing Business) सुधारण्यावरही विभागाचा सातत्याने भर असल्याची माहिती विभागामार्फत देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत

Plastic Currency : चलनात येणार १० आणि २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने १० रुपये आणि २० रुपये मूल्याच्या प्रत्येकी एक अब्ज प्लास्टिक बँक नोटांना फील्ड

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Eknath Shinde : नांदेडमध्ये शिवसेनेला बळ; विविध पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

मुंबई : नांदेड जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनवाढीला आणखी बळ मिळाले आहे. शंकरअण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली

Nashik TCS Case : मतीन पटेलचा कारागृहातील मुक्काम वाढला

Nashik TCS Case : नाशिकमधील बहुचर्चित टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीत घडलेल्या लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतर