रिझवी, स्तब्सच्या शतकी भागिदारीच्या जोरावर दिल्लीने लखनऊला हरवले

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केले. १४२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सलाही बॅकफूटवर जावे लागले होते, परंतु समीर रिझवी आणि त्रिस्तान स्तब्स ही जोडी मैदानावर उभी राहिली. या दोघांनी लखनऊ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दिल्लीने ६ विकेट्स राखून हा सामना जिंकला. दिल्लीच्या लुंगी एनगिडी व टी नटराजन यांच्यासह कुलदीप यादव या गोलंदाजांनी छाप पाडली.


दिल्ली कॅपिटल्सने उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन करताना लखनऊ सुपर जायंट्सला १८.४ षटकांत १४१ धावांवर गुंडाळले. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून लखनौला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. लखनौकडून सलामीला आलेल्या मिचेल मार्शने ३५ धावांची खेळी करून दमदार सुरुवात करून दिली. पण त्यानंतर विकेट्सची रांग लागली. ऋषभ पंत ७, एडन मारक्रम ११, आयुष बदोनी ०, निकोलस पूरन ८ धावा करून माघारी परतला. तर अब्दुल समदने ३६ तर शाहबाज अहमदने १५ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या १४० पार पोहोचवली. पण १४१ धावांवर संघाचा संपूर्ण डाव आटोपला. दिल्लीकडून गोलंदाजी करताना लुंगी एन्गिडी आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. तर कुलदीप यादवने २ अक्षर पटेलने १ गडी बाद केला. दिल्लीकडून मिचेल मार्स ( ३५) व अब्दुल समज ( ३६) हे दोघं वगळल्यास एकाही फलंदाजाला १५ पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. कर्णधार रिषभ पंत ( ७) तिसऱ्या षटकात विचित्र पद्धतीने रन आऊट झाला.


अक्षरने त्याच्या गोलंदाजांचा सुरेख वापर करून देताना लखनौवर दडपण ठेवले आणि स्टार फलंदाजांची फौज असलेला लखनौचा संघ ढेपाळला. दिल्ली कॅपिटल्सची सुरुवातही काही खास झाली नाही. मोहम्मद शमीच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर लोकेश राहुल षटकार मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. दरम्यान, आयपीएलमध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याची शमीची पाचवी वेळ ठरली. त्यानंतर प्रविण कुमार, उमेश यादव, ट्रेंट बोल्ड, लसिथ मलिंगा, भुवनेश्वर कुमार, अशोक दिंडा व पॅट कमिन्स यांनी तीनवेळा असा पराक्रम केला आहे. त्यानंतर पथूम निसंका ( १) व नितीश राणा ( १५) यांना अनुक्रमे प्रिन्स यादव व मोहसिन खान यांनी माघारी पाठवले. दिल्लीचे ३ फलंदाज २५ धावांवर तंबूत परतले. प्रिन्सने त्याच षटकात दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलचा त्रिफळा उडवला. त्रिस्तान स्तब्स व समीर रिझवी ही जोडी मैदानावर उभी राहिली आणि दोघांनी ३१ चेंडूंत अर्धशतकीय भागीदारी पूर्ण केली. शाहबाद अहमदने टाकलेल्या १०व्या षटकात या दोघांनी १६ धावा कुटल्या आणि आत्मविश्वास कमावला. रिझवीने ३८ चेंडूंत अर्धशतक झळकावताना ४ चौकार व २ षटकार लगावले आणि सामना दिल्लीच्या बाजूने झुकवला. त्याला साथ द्यायला स्तब्स होताच आणि दोघांनी ७० चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली. स्तब्सने ३२ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३९ धावांची नाबाद खेळी केली. रिझवीने ४७ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ७० धावा करून दिल्लीला १८व्या षटकात विजय मिळवून दिला.

Comments
Add Comment

नवी मुंबईत जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्याचे नियोज - मंत्री आशिष शेलार

मुंबई : नवी मुंबईत जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक नियोजन तातडीने पूर्ण करून स्टेडियमसाठी

Mohammed Shami : "मी जेव्हा..."; निवृत्तीच्या चर्चांवर मोहम्मद शमीने सोडले मौन

मुंबई : टीम इंडियासोबत आयसीसी २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा मोहम्मद शमी अचानक गायब झाला. चॅम्पियन्स

IPL 2026 : तेवतियाच्या बॅटवर पंचांचा आक्षेप! ऐन सामन्यातच बदलावी लागली बॅट

मुंबई : आयपीएल २०२६ मधील गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यात केवळ पराभवच नाही, तर एक वादग्रस्त

IPL 2026 : पदार्पणाच्या सामन्यातच कॉनॉलीचा ‘वन-मॅन शो’; पंजाबचा गुजरातवर ३ विकेट्स राखून विजय

आयपीएल २०२६ ची दमदार सुरुवात करत पंजाब किंग्सने न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर येथे गुजरात टायटन्सवर ३ गडी राखून

William Langford : मुंबई इंडियन्सच्या मॅचनंतर BCCI च्या ब्रँड कास्ट इंजिनिअरचा रहस्यमयी मृत्यू, खोलीत आढळला मृतदेह

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध ट्रायडन्ट हॉटेलमध्ये आयपीएल २०२६ निमित्त भारतात आलेल्या बीसीसीआयच्या ब्रॉडकास्ट

IPL 2026 : हंगामातील चौथ्या सामन्यात पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

मुंबई : आयपीएल २०२६ च्या चौथ्या सामन्यात मंगळवारी (३१ मार्च) पंजाब किंग्सचा सामना गुजरात टायटन्सशी होईल. हा सामना