IPL 2026 : तेवतियाच्या बॅटवर पंचांचा आक्षेप! ऐन सामन्यातच बदलावी लागली बॅट

मुंबई : आयपीएल २०२६ मधील गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यात केवळ पराभवच नाही, तर एक वादग्रस्त घटना देखील चर्चेत आली. गुजरातचा स्टार फलंदाज राहुल तेवतीया (Rahul Tewatia) याला ऐन सामन्यातच आपली बॅट बदलावी लागली, आणि त्यामुळे काही काळ सामना थांबला.



बॅट का बदलावी लागली?


सामन्यादरम्यान बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी तेवतियाच्या बॅटची तपासणी केली. ही बॅट निर्धारित मापांपेक्षा मोठी असल्याचं आढळून आलं. आयपीएलमध्ये यंदापासून बॅटच्या आकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमांनुसार बॅटची जाडी आणि रुंदी ठराविक मर्यादेत असणं आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे तेवतियाला तात्काळ बॅट बदलण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे मैदानावर काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.





सामन्याचा आढावा :


या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध कामगिरी करत गुजरातला २० षटकांत १६२ धावांवर रोखलं. गुजरातकडून कर्णधार शुभमन गिल Shubman Gill (३९) आणि जॉस बटलर Jos Buttler (३८) यांनी महत्त्वपूर्ण धावा केल्या. पंजाबकडून युजवेंद्र चहल आणि मार्को यानसन यांनी प्रभावी गोलंदाजी करत गुजरातच्या डावाला लगाम घातला.



वादामुळे वाढली चर्चा :


सामन्यातील या बॅट प्रकरणामुळे आयपीएलमध्ये नियमांची काटेकोर अंमलबजावणी होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. पुढील सामन्यांमध्ये अशा तपासण्या आणखी कडक होण्याची शक्यता असून, खेळाडूंना नियमांचे पालन करण्याबाबत अधिक सतर्क राहावं लागणार आहे.

Comments
Add Comment

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

Namibia T20I Tri-Series : दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर सात गडी राखून दणदणीत विजय

नवी दिल्ली : झिम्बाब्वेला सात गडी राखून पराभूत करून दक्षिण आफ्रिकेने तिरंगी मालिकेत आपले आव्हान कायम ठेवले आहे.