गेल्या 24 तासांत सोन्याचे दर 3,500 रुपये वाढले
चांदीच्या भावातही 3,000 रुपयांची झाली वाढ
जळगाव : सोन्या-चांदीच्या बाजारात पुन्हा एकदा मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. गेल्या 24 तासांत सोन्याचा भाव तब्बल 3,500 रुपये वाढून 1 लाख 49 हजार 500 रुपये प्रति तोळा झाला आहे. जीएसटीसह हा दर 1 लाख 53 हजार 985 रुपयांवर पोहोचला आहे.
चांदीच्या भावातही वाढ झाली असून, चांदीचा भाव 2 लाख 43 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. जीएसटीसह हा दर 2 लाख 50 हजार 290 रुपयांवर गेला आहे.तज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, आर्थिक अनिश्चितता आणि गुंतवणूकदारांचा वाढता कल यामुळे सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. येत्या काळातही या भावात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.