Akola Crime : अकोल्यात वर्दीला काळिमा फासणारी घटना; कोठडीतल्या महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

अकोला : 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे महाराष्ट्राच्या पोलिसांचे ब्रीदवाक्य, ज्याचा आदर संपूर्ण महाराष्ट्राला आहे. पण हेच रक्षक आता भक्षक बनले आहेत, असं म्हटलं तरी त्यात काही चुकीचं ठरणार नाही. कारण अकोल्यात घडलेल्या संतापजनक प्रकाराने पोलीस खरंच आपले रक्षणकर्ता आहेत की नाही? हा प्रश्न उपस्थित होतो आहे. जी वर्दी संपूर्ण महाराष्ट्रातील स्त्रियांचं रक्षण करण्यासाठी कायम सक्षम आणि पुढे असते, त्याच वर्दीला अकोल्यातील प्रकाराने काळे डाग लागले आहेत.



नेमकं घडलं काय?


एका महिलेला ८० लाख रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली. अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या कोठडीत ही महिला कैद आहे. तिथेच आपलं कर्तव्य बजावत असलेल्या राजेश जाधव यांनी मर्यादेचे उल्लंघन करत संबंधित महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. तू खूप सुंदर दिसतेस, तुझी मुलगीही अगदी तुझ्यासारखी सुंदर आहे. तिला माझ्याकडे पाठव त्या बदल्यात मी तुला १०,००० देतो, असे सांगितले. एका पोलिसाची ही मागणी ऐकताच महिलेला धक्का बसला, महिलेने घाबरून न जात हा सर्व प्रकार उपस्थित असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला सांगितला.



महिला कर्मचारी आली मदतीला


पोलीस महिला कर्मचारी हिने तात्काळ हा प्रसंग वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळवला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात येताच संताप व्यक्त करत , वर्दीची लाज राखा असे कडक शब्दात सुनावले आणि आरोपी पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव यावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहेत.


पीडित महिलेच्या फिर्यादीवरून राजेश जाधव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला तातडीने निलंबित करण्यात आले आहे. सुदर्शन पाटील (SDPO, अकोला) यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेत कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.


घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला, आणि संपूर्ण महाराष्ट्र भरातून पोलीस अधिकाऱ्यावर कडक शिक्षेची मागणी करण्यात आली आहे. तसेच सामाजिक क्षेत्रातून या घटनेचा निषेध व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी