आयपीएल २०२६ ची दमदार सुरुवात करत पंजाब किंग्सने न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर येथे गुजरात टायटन्सवर ३ गडी राखून रोमांचक विजय मिळवला. या विजयाचा खरा हिरो ठरला कूपर कॉनॉली. ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर कूपर कॉनॉली याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच नाबाद ७२ धावांची झंझावाती खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
गुजरातची चांगली सुरुवात, पण मधल्या फळीत घसरण :
यानंतर जॉस बटलर (३८) आणि ग्लेन फिलिप्स (२५) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण वैशाक विजयकुमार आणि चहलच्या अचूक गोलंदाजीसमोर गुजरातची फलंदाजी डळमळली. शेवटी राहुल तेवतियाच्या छोटेखानी खेळीच्या जोरावर गुजरातने २० षटकांत ६ बाद १६२ धावा केल्या.
कॉनॉली-प्रभसिमरनची भागीदारी :
१६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात धक्कादायक झाली. प्रियांश आर्या लवकर बाद झाला. यानंतर प्रभसिमरन सिंह (३७) आणि कूपर कॉनॉली याने आक्रमक फलंदाजी करत संघाला सावरलं. दोघांच्या भागीदारीमुळे पंजाबने पॉवरप्लेमध्ये ५५ धावा केल्या.
११०/३ वरून ११८/६… सामना गुजरातच्या बाजूने झुकला!
मात्र मधल्या षटकांत पंजाबचा डाव कोसळला. श्रेयस अय्यर (१८), नेहाल वढेरा (३), शशांक सिंह (४) आणि मार्कस स्टोइनिस (०) झटपट बाद झाले.
११०/३ वरून पंजाब ११८/६ अशा बिकट अवस्थेत पोहोचला आणि सामना गुजरातच्या बाजूने झुकला.
कॉनॉलीचा ‘वन-मॅन शो’ :
संकटाच्या क्षणी कूपर कॉनॉलीने जबाबदारी घेतली आणि शेवटपर्यंत नाबाद राहत ४४ चेंडूत ७२ धावा ठोकल्या. त्याच्या खेळीत ५ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. त्याच्या या शानदार खेळीमुळे पंजाबने सामना जिंकत आयपीएल २०२६ मध्ये विजयी सलामी दिली.
अर्शदीप सिंगच्या नावावर नकोसा विक्रम:
गोलंदाजीत कोण चमकले?
गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णाने ३ बळी घेतले, तर कगिसो रबाडा, राशिद खान, वॉशिंग्टन सुंदर आणि अशोक यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. एकंदरीत, सामना पूर्णपणे चुरशीचा झाला, पण शेवटी कॉनॉलीच्या धडाकेबाज खेळीने पंजाब किंग्सने विजयावर शिक्कामोर्तब केलं.