Lokesh Chandra Additional Chief Secretary : लोकेश चंद्रा मुख्यमंत्र्यांचे नवे अतिरिक्त मुख्य सचिव

मुंबई : राज्याच्या प्रशासनात वरिष्ठ स्तरावर मंगळवारी मोठे फेरबदल करण्यात आले असून, १० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पालिकेची धुरा सांभाळतानाच मुंबई मेट्रो रेल महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडेच कायम ठेवण्यात आला आहे. मावळते मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून अश्विनी भिडे यांनी पदभार स्वीकारला. भिडे यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिवपदी 'महावितरण'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे, आपल्या शिस्तबद्ध आणि धडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण विभागात कार्यरत असताना त्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे मिळवणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू केली होती. ही कारवाई सुरू असतानाच आता त्यांची बदली आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे. मुंढे यांच्या २० वर्षांच्या कारकिर्दीतील ही २२ वी बदली ठरली आहे.


प्रशासकीय कामाचा अनुभव असलेल्या विकास चंद्र रस्तोगी यांची वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा) अतिरिक्त मुख्य सचिवपदी वर्णी लागली आहे. तर, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांची मृद आणि जलसंधारण विभागात बदली करण्यात आली आहे. परिमल सिंग हे कृषी आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव म्हणून कार्यभार सांभाळतील. प्रेरणा देशभ्रतार यांची नियुक्ती मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्त पदी करण्यात आली आहे. तर, वसई-विरार महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी. पी. यांची निवड करण्यात आली आह. तुकाराम मुंढे यांच्या जागी माणिक गुरसळ हेदिव्यांग कल्याण विभाग कारभार पाहतील. शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची जबाबदारी लहू माळी यांच्याकडे देण्यात आली आहे.


Comments
Add Comment

Mumbai : जो पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न बघितले तोच पुरस्कार देणारे हात झाले

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते समाजातील ४४ महिलांचा गौरव मुंबई (विशेष प्रतिनिधी) : क्षेत्र कोणतेही

Ashwini Bhide : पहिल्या महिला मुंबई महापालिका आयुक्त म्हणून आश्विनी भिडे यांनी स्वीकारला पदभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर ज्येष्ठ सनदी अधिकारी आश्विनी भिडे

Mahavir Jayanti : 'जागतिक अस्थिरतेच्या काळात महावीरांचा अहिंसेचा मार्गच मानवतेला तारू शकतो'

मुंबई : जागतिक पातळीवर वाढत असलेल्या युद्धजन्य परिस्थिती, हिंसा आणि असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर भगवान

kurla bus accident : कुर्ला बस दुर्घटना प्रकरणातील आरोपी बस चालकाला जामीन

मुंबई: सव्वा वर्षापूर्वी कुर्ला पश्चिम येथे बेस्टचा भीषण अपघात झाला होता. या अपघात दुर्घटनेतील आरोपी चालक संजय

Maharashtra : महाराष्ट्रात १६ मेपासून जनगणना, देशात प्रथमच डिजिटल पद्धतीचा वापर

मुंबई : २०२७ च्या जनगणनेचे वेळापत्रक देशव्यापी जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे ते

E-KYC : ई-केवायसी पूर्ण न केल्यास पगार रखडणार

मुंबई : राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयामुळे सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता पगार