Ashwini Bhide : पहिल्या महिला मुंबई महापालिका आयुक्त म्हणून आश्विनी भिडे यांनी स्वीकारला पदभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर ज्येष्ठ सनदी अधिकारी आश्विनी भिडे यांनी मावळते महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून आयुक्त पदाचा पदभार मंगळवारी ३१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी स्‍वीकारला. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी विराजमान होणाऱ्या भिडे या पहिल्या महिला सनदी अधिकारी आहेत. आयुक्त पदाची सुत्रे हाती घेताच भिडे यांनी यापूर्वी या महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून सुमारे चार वर्षे काम केल्यामुळे सर्वांची माहिती मला आहे असे सांगत मुंबईकरांसाठी आणि शहरासाठी चांगले काम करू,असा शब्द देत विश्वास व्यक्त केला. मंगळवारी सायंकाळी महापालिका मुख्यालयात आयुक्त कार्यालयात जात आश्विनी भिडे यांनी आपल्या पदाचा भार स्वीकारत प्रसार माध्यमांशीही चर्चा केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपीन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त यांचे कार्यालय) प्रशांत गायकवाड यावेळी उपस्थित होते.


यावेळी मावळते महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचे स्वागत केले.तसेच यापुढे महापालिकेच्या कारभाराचे पूर्ण नियोजन आता यापुढे त्या करतील असे सांगत त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच मला आयुक्त म्हणून ही संधी शासनाने दिली होती, त्यामुळे मी शासनाचा ऋणी आहे. तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी मला दोन वर्षे सांभाळून घेतले. खऱ्या अर्थाने महापालिकेचे अधिकारी कार्यक्षम असून त्यांनी महापालिकेचा पताका उंचावर नेण्याचा प्रयत्न केला आहे,असे सांगत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.


आयुक्तपदाची सुत्रे गगराणी यांच्याकडून स्वीकारल्यानंतर माध्यमांशी बोलतांना आश्विनी भिडे यांनी यापदावर आपल्याला संधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानले तसेच डॉ भूषण गगराणी या पदावर त्यांनी आपली यशस्वी कारकिर्द पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले. गगराणी यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण भारतीय प्रशासकीय सेवेत आला होतो, असे सांगत भिडे यांनी यापूर्वी मी महापालिकेत चार वर्षे काम केले आहे.कोविड काळात काम करण्याची संधी लाभली होती. या महापालिकेने मुंबईकरांचे आयुष्य समृध्द केले. त्यामुळे यापूर्वीच्या सर्वच आयुक्तांनी यात भार टाकली आहे, त्या परंपरेचा भाग होताना आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.


नवीन आव्हान येतात, आयुक्त पदाची सुत्रे हाती घेताना यापूर्वीचेही आयुक्त आव्हानांना सामोरे गेले होते. त्यामुळे या आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर सर्व टिमच्या मदतीने आलेल्या आव्हानांना सामोरे जावू. आजवर महिला अधिकाऱ्याला या पदावर संधी मिळाली नव्हती, म्हणून पहिल्या महिला आयुक्त म्हणता. पण मुंबई महापालिका याभूत सुविधा देण्याचे काम करते तसेच, तसेच मुंबईतील महिलांचे जीवनमान उंचावण्याचाही केला जाईल. मागील अतिरिक्त आयुक्त म्हणून जी चार वर्षे सेवा बजावली त्यातील दोन वर्षे लोकप्रतिनिधींसोबत आणि दोन वर्षे प्रशासक काळातील होती. पण आता नगरसेवक आल्यामुळे आता खऱ्या अर्थाने महापालिका असल्यासारखी वाटते,अशा भावना व्यक्त केल्या.


भिडे यांचा परिचय


आश्विनी भिडे या भारतीय सनदी सेवेतील १९९५ च्‍या तुकडीतील अधिकारी असून त्‍यांना सनदी सेवेचा सुमारे ३१ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत महाराष्‍ट्रात विविध महत्‍त्‍वपूर्ण पदांचा कार्यभार सांभाळला आहे. यामध्‍ये प्रामुख्‍याने जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयाच्‍या अतिरिक्त विभागीय आयुक्‍त, महाराष्‍ट्र शासनामध्‍ये सह सचिव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एम.एम.आर.डी.ए.) अतिरिक्त महानगर आयुक्त, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्‍या सचिव, मुख्यमंत्री यांच्या अपर मुख्य सचिव म्‍हणून आश्विनी भिडे यांनी काम पाहिले आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालक म्हणून त्‍यांनी मुंबईत मेट्रो रेल्वेचे जाळे निर्माण करण्‍यात महत्‍त्‍वाचे योगदान दिले आहे.


आश्विनी भिडे यांनी यापूर्वी मुंबई महानगरपालिकेत ९ मे २०२० ते दिनांक १९ मार्च २०२४ या कालावधीत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) या पदावर कार्य केले आहे. मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाच्या पूर्णत्वामध्येही भिडे यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे.

Comments
Add Comment

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून

CM Devendra Fadnavis : मुंबईत ‘भुलेश्वरचा राजा’च्या आगमन मिरवणुकीत घडलेल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी केला शोक व्यक्त

मुंबई : मुंबईतील भुलेश्वर परिसरात ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्तीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान शनिवारी (दि. २२ ऑगस्ट)

Mumbai-Ahmedabad Bullet Train : भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनसाठी १६ चालकांची नियुक्ती; जपानमध्ये वर्षभर विशेष प्रशिक्षण

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या संचालनासाठी मनुष्यबळाची तयारी वेगाने सुरू झाली आहे. नॅशनल