Maharashtra : महाराष्ट्रात १६ मेपासून जनगणना, देशात प्रथमच डिजिटल पद्धतीचा वापर

मुंबई : २०२७ च्या जनगणनेचे वेळापत्रक देशव्यापी जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल. स्व-गणना १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत केली जाईल. हा देशव्यापी जनगणना कार्यक्रम १६ एप्रिल २०२६ रोजी सुरू होईल आणि ३० सप्टेंबरपर्यंत चालेल. ही जनगणना प्रथमच डिजिटल पद्धतीने केली जात असून, प्रथमच स्व-गणनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्व-गणना ही एक सुरक्षित वेब-आधारित सुविधा आहे, ज्याद्वारे प्रतिसादक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यापूर्वी १६ भाषांमध्ये आपली माहिती ऑनलाइन नोंदवू शकतात. या जनगणनेत डेटाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक तरतुदी करण्यात आल्या आहेत. देशभरात ३० लाखांहून अधिक गणक, पर्यवेक्षक आणि इतर अधिकारी २०२७ ची जनगणना पार पाडतील. गणक त्यांच्या स्मार्टफोनचा वापर करून एका मोबाईल ॲपद्वारे थेट डेटा गोळा करून सादर करतील.


भारताच्या भविष्यातील नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘जनगणना २०२७’ आता प्रत्यक्षात सुरू होत आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा, जो ‘घरयादी व घरगणना’ असा आहे, तो आगामी १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. ‘आपली जनगणना – आपला विकास’ या संकल्पनेवर आधारित ही प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या पहिल्या टप्प्यात केवळ घरांची नोंदणी आणि घरांमध्ये उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांची माहिती संकलित केली जाणार आहे. या टप्प्यात प्रगणक घरोघरी जाऊन घराला क्रमांक देणे, घराचे स्वरूप (कच्चे/पक्के), पिण्याचे पाणी, वीज, शौचालय आणि कुटुंबातील सदस्यांची प्राथमिक माहिती घेतील.


माहिती गोपनीय ठेवली जाणार : ‘सार्वजनिक कल्याणासाठी जनगणना’ ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना घाबरून न जाता किंवा कोणतीही माहिती न लपवता वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दिलेली सर्व माहिती कायदेशीररीत्या गोपनीय ठेवली जाणार असून, तिचा वापर केवळ लोककल्याणाच्या योजना आखण्यासाठीच केला जाणार आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे कुटुंबप्रमुखाकडून गणनाकाराला दिली जातील. गणनाकार ही माहिती सुरक्षितपणे संग्रहित करेल. ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पूर्ण केली जाईल.


कोव्हिड महामारीमुळे विलंब : नियमानुसार, दर १० वर्षांनी जनगणना होणे अपेक्षित असते, त्यानुसार २०२१ मध्ये जनगणना होणे नियोजित होते. मात्र, कोविड-१९ महामारीच्या संकटामुळे ती पुढे ढकलण्यात आली. २०११ मध्ये झालेली जनगणना ही १५ वी राष्ट्रीय जनगणना होती. त्यावेळी झालेल्या जनगणनेत महाराष्ट्राची लोकसंख्या साधारणपणे ११.२४ कोटी इतकी नोंदवण्यात आली होती. २०२१ ची प्रलंबित जनगणना कोरोना महामारीनंतर विविध तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे ही प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही.

Comments
Add Comment

Mumbai : जो पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न बघितले तोच पुरस्कार देणारे हात झाले

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते समाजातील ४४ महिलांचा गौरव मुंबई (विशेष प्रतिनिधी) : क्षेत्र कोणतेही

Ashwini Bhide : पहिल्या महिला मुंबई महापालिका आयुक्त म्हणून आश्विनी भिडे यांनी स्वीकारला पदभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर ज्येष्ठ सनदी अधिकारी आश्विनी भिडे

Mahavir Jayanti : 'जागतिक अस्थिरतेच्या काळात महावीरांचा अहिंसेचा मार्गच मानवतेला तारू शकतो'

मुंबई : जागतिक पातळीवर वाढत असलेल्या युद्धजन्य परिस्थिती, हिंसा आणि असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर भगवान

Lokesh Chandra Additional Chief Secretary : लोकेश चंद्रा मुख्यमंत्र्यांचे नवे अतिरिक्त मुख्य सचिव

मुंबई : राज्याच्या प्रशासनात वरिष्ठ स्तरावर मंगळवारी मोठे फेरबदल करण्यात आले असून, १० सनदी अधिकाऱ्यांच्या

kurla bus accident : कुर्ला बस दुर्घटना प्रकरणातील आरोपी बस चालकाला जामीन

मुंबई: सव्वा वर्षापूर्वी कुर्ला पश्चिम येथे बेस्टचा भीषण अपघात झाला होता. या अपघात दुर्घटनेतील आरोपी चालक संजय

E-KYC : ई-केवायसी पूर्ण न केल्यास पगार रखडणार

मुंबई : राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयामुळे सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता पगार