Ashok Kharat Case : शिक्षण विभागाच्या शालेय आयडी घोटाळ्यातही भोंदू बाबा खरातचा सहभाग, स्वतःच्या भावाला मिळवून दिले आयडी

मुंबई : भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या प्रकरणांमध्ये आता नवीन ट्विस्ट निर्माण झाला असून नाशिक शहरांमध्ये काही महिन्यापूर्वी दाखल झालेल्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणातही सहभाग असल्याचे समोर आले आहे यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.


१८ मार्च रोजी अटक करण्यात आलेला भोंदू बाबा अशोक खरात चे कारनामे काहीही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीये रोज नवीन कारनामे समोर येत आहे. २४ मार्चला खरातची कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात सादर करण्यात आले होते. त्यावेळी २९ मार्च पर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली होती. आता १ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आलेली आहे. त्यामुळे एसआयटीच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.


सर्वसाधारण नाशिक जिल्ह्यामध्ये झालेला शालेय आयडी घोटाळा प्रकरणात नाशिक रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यामध्ये माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी तसेच जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी बच्छाव यांच्यासह काही जणांना अटक करण्यात आली आहे तर या सर्व प्रकरणांमध्ये सर्वसाधारण १५९ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे सहभागी असल्याचे समोर येत आहे त्यामुळे या प्रकरणात अजून काही मोठी कारवाई होण्याची शक्यता आधीपासूनच व्यक्त केली जात होती.


या शालेय आयडी घोटाळ्याच्या तपास सुरू आहे आता या प्रकरणांमध्ये भोंदू बाबा अशोक खरात याचे देखील नाव समोर आलेले आहे. आता या प्रकरणाचा तपास एस आय टी मार्फत केला जाणार आहे. स्वतः खरात याने आपल्या भावासाठी देखील शालेय आयडी मिळून दिल्याचे समोर आले आहे, त्यामुळे या प्रकरणाला आता नवीन वळण मिळत आहे.

Comments
Add Comment

Women's and Children's Health : महिला व बालकांच्या पोषणात मोठी सुधारणा करण्याचे लक्ष्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई - राज्यातील कुपोषणावर प्रभावी नियंत्रण मिळवून महिला व बालकांच्या आरोग्य (Women's and Children's Health) आणि पोषणात लक्षणीय

Weather Update: राज्यात अवकाळीचा तडाखा, हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना तीन तासासाठी अलर्ट

मुंबई: राज्यात अवकाळी पावसाने जोर धरला आहे. पुणे हवामान विभागाने मराठवाड्यातील प्रमुख जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट'

ऐन उन्हाळ्यात पुण्याला पावसाने झोपडले; आयटी पार्कमध्ये साचला बर्फ

पुणे : ऐन उन्हाळयात भर दुपारी पावसाने पुण्यात हजेरी लावली. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा पाऊस आणि गारपिटीने

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला मिळणार 'टेक ऑफ'

मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवासासाठी १०० टक्के 'व्हिजिएफ' मंजूर; फ्लाय ९१ कंपनीची निवड, प्रति आसन २ हजार ९९१ रुपये

बिकट परिस्थिती, घरची जबाबदारी, अन पोलीस भरतीच स्वप्न; नेमकं भरतीवेळी शरीर थकलं अन्...

पुणे : अनेक होतकरू तरुण सरकारी नोकरीचा पाठलाग करत असतात. नोकरी मिळवून कुटुंबाला गरीबीतून बाहेर काढण्याचं स्वप्न

येत्या तीन महिन्यांत 'पीएनजी' साठी अर्ज न केल्यास 'एलपीजी' सिलिंडर बंद

मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा; व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस पुरवठ्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ मुंबई : राज्यातील