- वर्षाला सुमारे अडीच कोटी रुपयांचा केला जातो खर्च
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
वांद्रे कुर्ला संकुलातील संकुलात मागील दहा वर्षांपासून यांत्रिक झाडूद्वारे रस्त्यांची सफाई केली जात असून आता नव्याने या यांत्रिक झाडूच्या कामांसाठी तीन वर्षांकरता कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. बीकेसीतील या २१ ६० किलोमीटर लांबीच्या या सर्व रस्त्यांच्या यांत्रिक सफाईसाठी वर्षाला सरासरी अडीच कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे तीन वर्षांकरता एकूण ७ कोटी २२ लाख रुपयांचे कंत्राट काम बहाल करण्यात आले आहे. वांद्रे कुर्ला संकुला परिसर हा एमएमआरडीएच्या ताब्यात असून त्या भागाची स्वच्छता संबंधित प्राधिकरणाने करायला हवी, पण त्यांची काळजी महापालिकेलाच अधिक असल्याचे दिसून येते.
वांद्रे कुर्ला संकुल हे मुंबईतील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र म्हणुन विकसित केले गेले आहे. या संकुलात जगभरातील नावाजलेल्या व्यापारी संस्था आपला भारतातील कार्यभार चालवतात. त्याचप्रमाणे या संकुलात प्रगत देशांच्या दुतावासांची आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची क्षेत्रीय कार्यालये आहेत. सर्वसाधारण दररोज चार लाख एवढी माणसे या संकुलातील निरनिराळया कंपन्यांमध्ये काम करतात. बहुतांश आंतरराष्ट्रीय संस्थांची कार्यालये या परिसरात असल्यामुळे ब-याच परदेशी नागरीकांचा वावरही या संकुलात असतो. या सर्व वैशिष्ट्यांमुळे या संकुलाची तुलना जगभरातील तश्याच प्रकारच्या व्यापारी केद्रांशी केले केली जाते. याचसाठी या परिसरात आधुनिक आणि पर्यावरणपूरक सुविधा जसे मेट्रो, इलेक्ट्रीक बसेस यांचे जाळे निर्माण केले जात असल्याने साफसफाईसाठी सुध्दा विशेष काळजी घेतली जाते.
आधुनिकीकरणाचा एक भाग म्हणुन या परिसरात २०१४ पासुन रस्त्यांची यांत्रिकी झाडू संयंत्राने साफसफाई केली जाते. यापूर्वी असलेले कंत्राट फेब्रुवारी २०२६ रोजी संपुष्टात आला असून आता पुढील तीन वर्षांकरता या यांत्रिक फ सफाईच्या कामांसाठी लक्ष्य एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीची निवड झाल्यानंतर प्रत्यक्षात स्थायी समितीची मंजुरी प्राप्त होण्यास लागणारा विलंब लक्षात घेवून महापालिका आयुक्तांनी आपल्या अधिकारात ८५ दिवसांची मुदत अर्थात सुमारे ५०लाख रुपयांचे कंत्राट दिले असल्यामुळे या साफसफाईच्या कामांमध्ये कुठेही खंड पडलेला नाही,असे विभागाकडून सांगण्यात येत आहे.