Malad West Flyover : मालाड पश्चिम उड्डाणपूल, रस्ता रुंदीकरणाच्या कंत्राटात महापालिकेचा अनोखा प्रयोग

- एल अँड टी पात्र, पण नुकसान भरपाईची ३५० कोटी रक्कम वाचवण्यासाठी जे कुमार आरपीएस कंपनीला दिले काम


मुंबई (सचिन धानजी)


मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथच असा प्रकार घडला असून एखादे कंत्राट केल्यानंतर संबंधित कंपनीने तब्बल नुकसान भरपाई म्हणून कोट्यवधी रुपयांचा दावा केल्यानंतर प्रशासनाने दुसऱ्याच एका कामांमध्ये ज्या दरात लघुत्तम निविदाकार पात्र ठरेल त्याच दरात काम करायची तयारी असणाऱ्या कंपनीला ते काम मिळवून देत कोट्यवधी रुपयांची नुकसान भरपाई टाळत संबंधित कंपनीचेही चांगभले केले आहे. मालाड पश्चिम येथील पुलाच्या (Malad West Flyover) आणि मार्वे रोडच्या रुंदीकरणाच्या कामांमध्ये हा प्रकार घडला आहे. तब्बल ३५० कोटी रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम टाळण्यासाठी या कामांचे विविध करांसह साडेतीन हजार कोटी रुपयांचे काम त्यांच्या पदरात टाकले. या कामासाठी लार्सन अँड टुब्रो या कंपनीने कमी बोली लावून काम मिळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु याच दरामध्ये जे कुमार आणि आरपीएस या कंपनीने तयारी दर्शवल्यामुळे प्रशासनाने एल अँड टी ऐवजी याकंपनीची निवड केली आहे.


मालाड (पश्चिम) येथील एमडीपी मार्ग ते रायन इंटरनॅशनल स्कूल ह्यांना जोडणा-या नाल्यावरील वाहतूक पूल व उन्नत मार्गाचे चारकोप जंक्शन ते रायन इंटरनॅशनल स्कूल यांना जोडणा-या अतिरिक्त आर्मच्या बांधकामासहीत महाकाली जंक्शन येथील मनोरंजन मैदानासमोरील बाजू ते गिरीधर पार्क मीठ चौकीजवळील नाल्यापर्यंत मालाड मार्वे रस्त्याचे साडेतीन मीटरने रुंदीकरण करुन अतिरिक्त आर्म वांधणेबाबतच्या कामांसाठी महापालिकेच्या पूल विभागाने निविदा मागवल्या होत्या. या निविदा प्रक्रिया सुरु असतानाच पूर्व मुक्त महामार्ग ते ग्रँटरोड येथील पुलाच्या नियोजित कामांचे कंत्राट रद्द केल्यामुळे संबंधित कंपनी असलेल्या जे.कुमार-आपीएस संयुक्त भागीदारीतील कंपनीने ३५० कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचा दावा केला. मात्र हा दावा करतानाच त्यांनी मालाडमधील नाल्यावरील पूल तसेच मार्वे रोडच्या रुंदीकरणाच्या कामांमध्ये 'पहिला नकार देण्याचा अधिकार' या अटीच्या अनुषंगाने या निविदेमध्ये पात्र ठरणारी तथा लघुत्तम ठरणारी कंपनी जी बोली लावेल त्या दरात आम्ही काम करू, आणि त्या दरात जर आम्ही काम केले तर नुकसान भरपाईपोटी दावा केलेले ३५० कोटी रुपये महापालिका प्रशासनाने देवू नये,असे कळवले. त्यानुसार या कामांमध्ये भाग घेणाऱ्या निविदेत लार्सन अँड टुब्रो या कंपनीने अंदाजित दरापेक्षा उणे २५ टक्के दर आकारला. तर दुसऱ्या क्रमांकाची बोली जे कुमार आरपीएस कंपनीची होती. त्यामुळे या कंपनीला एल अँड टीच्या बोली लावलेल्या दरात काम करण्यास तयार आहात का याची विचारणा केली आणि या कंपनीने त्यासाठी तयारीही दर्शवली. त्यामुळे जे कुमार आरपीएसची या कामांसाठी निवड झाल्यामुळे महापालिकेला सुमारे ३५० कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी देण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे एकप्रकारे प्रशासनाने ३५० कोटी रुपये वाचवतानाच या पुलांच्या कामांसाठी जे कमीत कमी बोली लावणाऱ्या कंपनीला काम देणार होते, त्याच दरात हे काम करून घेत असल्यामुळे महापालिका प्रशासनाचेही कोणतेही नुकसान होणार नाही. त्यामुळे ३५० कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी देणे टाळण्यासाठी प्रशासनाने अनोख्या पध्दतीने शक्कल लढवत त्या कंपनीच्या मनाचे समाधान करत काम बहाल करण्याचा प्रयत्न केला आहे, असा प्रकार महापालिकेच्या इतिहासात प्रथमच होत असल्याचे बोलले जात आहे.


महापालिकेने या कामांसाठी २२२५.९५ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च तयार केला होता, त्यातुलनेत एल अँड टी कंपनीने सुमारे उणे २६ टक्के म्हणजे १६४७ कोटी रुपयांमध्ये काम करण्यासाठी बोली लावली होती, याच दरात जे कुमार आणि आरपीएस ही कंपनी काम करणार आहे. विविध कर आणि सल्लागार शुल्कांसह याची एकूण कंत्राट किंमत ही ३४५६ कोटींवर पोहोचणार आहे.



या पुलाचा लाभ कुणाला :


मालवणी जनकल्याण नगर, चारकोप, मढमार्वे आणि मालाड पश्चिमच्या इतर भागातील वाहतूक वळवण्यासाठी अतिरिक्त मार्ग मिळणार आहे.

Comments
Add Comment

FYJC Admission 2026 : अकरावी प्रवेशाची शेवटची संधी? आज लागणार कॉलेज अलॉटमेंट लिस्ट; विद्यार्थ्यांनी ‘हे’ नक्की करा!

मुंबई : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

BMC News : महापालिकेच्या सहायक आयुक्तांमध्येच धुसफुस; व्हॉट्सअप ग्रुपवरुन बाहेर पडल्याने नाराजी उघड

- महापालिका आयुक्तांना आता याप्रकरणात लक्ष घालण्याची वेळ मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या

Water Storage Declining : महापालिका धरणांमधील पाणीसाठा घटतोय

- तब्बल ९० टक्क्यांच्या पुढे गेलेला साठा चार दिवसांत दीड टक्क्यांनी झालाय कमी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई पाणी

Global Warming : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका; मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा

- भाजप नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) भविष्यात उद्भवणाऱ्या जागतिक तापमान वाढ (ग्लोबल

Ganeshotsav 2026 ST Buses : बाप्पाच्या आगमनासाठी एसटी सज्ज! मुंबई, ठाणे, पालघरमधून धावणार शेकडो जादा बसेस; ‘या’ तारखेपासून विशेष सेवा

मुंबई : गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असून, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे.

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर