Maharashtra School : यंदा संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपासून सुरू होणार शाळा

मुंबई : दरवर्षी कडक उन्हाळ्यामुळे विदर्भात ३० जूनपासून तर राज्यात उर्वरित ठिकाणी १५ जूनपासून शाळा सुरू करण्याची पद्धत आहे. पण २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपासून शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे. पूर्ण राज्यात एकसमान शैक्षणिक वेळापत्रक सुरू ठेवण्याच्या उद्देशाने हा बदल केला जाणार आहे. राज्यातील सर्व शाळांना २ मे २०२६ पासून उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे.


यंदा विदर्भासह सर्व विभागांतील शाळा १५ जूनपासूनच सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जून पासून होणार आहे. राज्यातील सर्व विभागांतील शाळांनी याच तारखेपासून नियमित अध्यापनास प्रारंभ करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.


विदर्भातील शाळा १५ ते २७ जून या कालावधीत सकाळी ७ ते ११.४५ या वेळेत भरतील. हा अपवाद राज्याच्या उर्वरित भागांसाठी केला जाणार नाही. पण ३० जूनपासून राज्यातील सर्व शाळा नियमित वेळेनुसार भरतील.


राज्यातील सर्व राज्य मंडळाच्या शाळांमध्ये २ मेपासून विद्यार्थ्यांना अधिकृतपणे उन्हाळी सुट्टी लागू होईल. दरम्यान, इतर मंडळांच्या काही शाळांमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार किंवा शैक्षणिक उपक्रमांमुळे शाळा सुरू असल्यास, संबंधित शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून सुट्टी जाहीर करण्याबाबत निर्णय घ्यावा, असे निर्देश शासनाने दिले आहेत.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)