Iran Attack : इराणचा कुवेतच्या वीज आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला, एका भारतीयाचा मृत्यू

कुवेत सिटी : इराणने कुवेत सिटी जवळच्या वीज तसेच पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात एका भारतीय कामगाराचा मृत्यू झाला. कुवेतच्या वीज आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या सरकारी इमारतीचे हल्ल्यात मोठे नुकसान झाले.

इराणच्या हल्ल्यात नुकसान झाल्याची जाणीव होताच कुवेत सरकारने घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. वीज आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे विस्कळीत झालेले कामकाज पुन्हा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

कुवेतच्या राजाच्या प्रशासनाने नागरिकांना शांत राहा, अफवा पसरवू नका, पुढील सूचना मिळेपर्यंत घरात थांबा, दारं खिडक्या बंद ठेवा असे खबरदारीचे निर्देश दिले आहेत. अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणार असल्याचेही प्रशासनाने जाहीर केले आहे.

वीज आणि शुद्ध पाणी यांच्या पुरवठ्यात बाधा येऊ नये यासाठी कुवेतने एक आपत्कालीन योजना कार्यान्वीत केली आहे. लवकरच परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असेल, असे कुवेतच्या राजाच्या प्रशासनाने जाहीर केले आहे.

दक्षिण लेबनॉनमधील अदचित अल कुसैरजवळ युनिफिलच्या (UNIFIL) तळावर एक क्षेपणास्त्र आदळल्याने संयुक्त राष्ट्राचा एक शांतता सैनिक ठार झाला आणि एक शांतता सैनिक जखमी झाला आहे. युनिफिलने हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सैनिकाचे पार्थिव त्याच्या घरी पोहोचवण्याचे नियोजन सुरू असल्याचे सांगितले. तसेच घडलेल्या घटनेविषयी दुःख व्यक्त केले आहे. जखमी सैनिकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी सैनिकाला आवश्यक ती सर्व मदत पुरवली जात असल्याचे युनिफिलने सांगितले.

सर्वांनी आंतरराष्ट्रीय नियम आणि संकेतांचे पालन करावे. शांतता सैनिकांवरील हल्ला हा आंतरराष्ट्रीय गुन्हा आहे. हा गुन्हा करणे टाळा असे आवाहन युनिफिलने केले आहे. याआधी इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी हल्ले करत असल्याचे जाहीर केले. हिजबुल्लाहच्या स्फोटकांचा मोठा साठा सापडल्याचेही इस्रायलने जाहीर केले.
Comments
Add Comment

Trump : ट्रम्पचे विमान सापडले संकटात, नागरी विमान जवळ येऊ लागताच अमेरिकेच्या हवाई दलाने केली धावपळ

फ्लोरिडा : पश्चिम आशियातील युद्धामुळे जगात तणावाचे वातावरण असताना फ्लोरिडाच्या आकाशात धक्कादायक घटना घडली.

इस्रायलमधील मोठ्या केमिकल फॅक्टरीवर इराणचा हल्ला

तेल अविव : इराणने (Iran) बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने (Ballistic missile) इस्रायलच्या (Israel) एका प्रमुख रासायनिक कारखान्यावर अर्थात

US Iran Conflict अमेरिकेचे सैनिक इराणच्या जमिनीवर कुठेही उतरले तरी युद्धाचा मोठा भडका उडणार ?

Boots on Ground, तेहरान : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर हवाई हल्ले सुरू केले आणि पश्चिम आशियात युद्ध सुरू झाले. या

Australia's Red Sky : पाहावे ते नवलच! ऑस्ट्रेलियाचे आकाश झाले लाल; नेमकं कारण काय?

मुंबई : ऑस्ट्रेलिया मधील पश्चिम भागात अलीकडे एक विलक्षण नैसर्गिक घटना पाहायला मिळाली. २७ मार्च रोजी शार्क बे आणि

३,५०० मरीन सैनिकांसह अमेरिकेची यूएसएस त्रिपोली युद्धनौका युद्धक्षेत्रात दाखल

वॉशिंग्टन  : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस अधिक भीषण होत चालला आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या

अमेरिकी सैनिकांना शवपेट्यांमध्ये पाठवणार; इराणची अमेरिकेला धमकी

नवी दिल्ली: इराणच्या इंग्रजी दैनिक 'तेहरान टाइम्स'च्या पहिल्या पानावर आज 'नरकात आपले स्वागत आहे' (Welcome To Hell) या