इस्रायलमधील मोठ्या केमिकल फॅक्टरीवर इराणचा हल्ला

तेल अविव : इराणने (Iran) बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने (Ballistic missile) इस्रायलच्या (Israel) एका प्रमुख रासायनिक कारखान्यावर अर्थात केमिकल फॅक्टरीवर हल्ला केला आहे. इस्रायलमधील नेओत होवाव येथे मोठ्या केमिकल फॅक्टरीवर इराणने बॅलिस्टिक क्षेपणास्त्राद्वारे हल्ला केला. या हल्ल्यामुळे कारखान्यातून रसायन गळती (Chemical Leak) सुरू झाल्याचे वृत्त आहे. कारखान्यातून सतत मोठे काळ्या रंगाचे धुराचे लोट आकाश उंचच उंच जात असल्याचे दिसत आहे.


आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे मोठे पथक घटनास्थळी मदतकार्य करत आहे. अद्याप आग आणि गळती नियंत्रणात आलेली नाही. हल्ल्यात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पण मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिकांना घराबाहेर पडू नका असे सांगण्यात आले आहे. घरांची दारं खिडक्या बंद ठेवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. व्हायरल फोटो आणि व्हिडीओंमध्ये केमिकल फॅक्टरीला लागलेली आग दिसत आहे.


नेओत होवाव औद्योगिक क्षेत्र हे इस्रायलमधील एक प्रमुख रासायनिक आणि औद्योगिक केंद्र आहे. या भागात अनेक धोकादायक रसायनांचे उत्पादन आणि साठवणूक करण्याचे काम चालते. रसायन गळती झाल्याचे वृत्त असल्यामुळे परिसरात प्रचंड खबरदारी घेतली जात आहे.


पश्चिम आशियातील युद्धाला झाला एक महिना


अमेरिका आणि इस्रायल यांनी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणवर हवाई हल्ले सुरू केले आणि पश्चिम आशियात युद्ध सुरू झाले. या युद्धाला आज म्हणजेच रविवार २९ मार्च २०२६ रोजी एक महिना पूर्ण झाला. अमेरिकेने एका महिन्यात इराणची बहुतांश लढण्याची क्षमता नष्ट केल्याचा दावा केला आहे. पण होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करण्याची हिंमत अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांपैकी कोणाच्याही युद्धनौकेने तसेच व्यापारी जहाजांनी दाखवलेली नाही. इराणने अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांचे एकही जहाज होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकणार नाही असा इशारा देत आपला प्रभाव दाखवून दिला आहे. अमेरिका इराणला दणके दिल्याचे सांगत असली तरी अमेरिकेने महिन्याभरात स्वतःची काही लढाऊ विमानं, हवेतल्या हवेत इंधन भरणारी विमानं, अनेक हवाई सुरक्षा यंत्रणा आणि काही सैनिक गमावले आहेत. इराण अमेरिकेच्या पश्चिम आशियातील सैन्य तळांवर तसेच इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र यांच्याद्वारे वारंवार हल्ले करू लागला आहे. इराणच्या हल्ल्यात झालेल्या हानीबाबत अमेरिकेने अद्याप अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. पण सूत्रांच्या वृत्तानुसार युद्धामुळे अमेरिकेचेही अनपेक्षित असे मोठे नुकसान झाले आहे. इतर देशांनी अमेरिकेला मदत करू नये यासाठी इराणने मुद्दाम निवडक आखाती देशांतील अमेरिकेच्या सैन्य तळांना लक्ष्य करून हल्ले केले आहेत.

Comments
Add Comment

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Indonesia Earthquake : इंडोनेशियात ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा, मोठी जीवितहानी

इंडोनेशिया : इंडोनेशियाच्या पूर्व भागातील फ्लोरेस बेटाजवळ शनिवारी पहाटे ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप (Indonesia Earthquake)

Shehbaz Sharif News : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताला धमकी, सिंधू पाणी करारावरून पुन्हा एकदा गरळ ओकली

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित 'यादगार-ए-फतह' कार्यक्रमात बोलताना

Major blow in the Iran conflict : अमेरिकेने गमावला ड्रोन ताफ्याचा चतुर्थांश भाग, ४५ 'एमक्यू-९ रीपर' नष्ट

इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे अमेरिके

Apache Helicopter Accident : अमेरिकेच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे हेलिकॉप्टरचा भीषण अपघातात दोन पायलट्सचा मृत्यू

टेक्सास : अमेरिकेतील टेक्सास राज्यात अमेरिकन सैन्याच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे अटॅक हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला.