US Iran Conflict अमेरिकेचे सैनिक इराणच्या जमिनीवर कुठेही उतरले तरी युद्धाचा मोठा भडका उडणार ?

Boots on Ground, तेहरान : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर हवाई हल्ले सुरू केले आणि पश्चिम आशियात युद्ध सुरू झाले. या युद्धाला एक महिना झाला. अद्याप युद्ध संपण्याची शक्यता दिसत नाही. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे सैनिक इराणच्या जमिनीवर कुठेही उतरले तरी युद्धाचा मोठा भडका उडेल असा इशारा इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर कलिबाफ यांनी दिला आहे.


आम्ही शरणागती पत्करणार नाही, लढणे सोडणार नाही, असे इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर कलिबाफ यांनी सांगितले. इराणचे सशस्त्र दल अमेरिकेच्या सैनिकांना मारण्यासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी जाहीर केले. अमेरिकेच्या प्रादेशिक मित्र राष्ट्रांनी इराणविरुद्धच्या लष्करी कारवाईला पाठिंबा दिल्यास त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला.


इराणच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या प्रत्येक शत्रूशी दोन हात करून त्याचा बीमोड करण्यासाठी देश सज्ज आहे, असे इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर कलिबाफ म्हणाले. इराणचे सैन्य सज्ज आहे. आम्ही स्वप्नातही शरणागती पत्करणार नाही, असे बागेर कलिबाफ यांनी सांगितले.


अमेरिका आणि इस्रायल यांनी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणवर हवाई हल्ले सुरू केले आणि पश्चिम आशियात युद्ध सुरू झाले. या युद्धाला आज म्हणजेच रविवार २९ मार्च २०२६ रोजी एक महिना पूर्ण झाला. अमेरिकेने एका महिन्यात इराणची बहुतांश लढण्याची क्षमता नष्ट केल्याचा दावा केला आहे. पण होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करण्याची हिंमत अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांपैकी कोणाच्याही युद्धनौकेने तसेच व्यापारी जहाजांनी दाखवलेली नाही. इराणने अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांचे एकही जहाज होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकणार नाही असा इशारा देत आपला प्रभाव दाखवून दिला आहे. अमेरिका इराणला दणके दिल्याचे सांगत असली तरी अमेरिकेने महिन्याभरात स्वतःची काही लढाऊ विमानं, हवेतल्या हवेत इंधन भरणारी विमानं, अनेक हवाई सुरक्षा यंत्रणा आणि काही सैनिक गमावले आहेत. इराण अमेरिकेच्या पश्चिम आशियातील सैन्य तळांवर तसेच इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र यांच्याद्वारे वारंवार हल्ले करू लागला आहे. इराणच्या हल्ल्यात झालेल्या हानीबाबत अमेरिकेने अद्याप अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. पण सूत्रांच्या वृत्तानुसार युद्धामुळे अमेरिकेचेही अनपेक्षित असे मोठे नुकसान झाले आहे. इतर देशांनी अमेरिकेला मदत करू नये यासाठी इराणने मुद्दाम निवडक आखाती देशांतील अमेरिकेच्या सैन्य तळांना लक्ष्य करून हल्ले केले आहेत.

Comments
Add Comment

Pirates kidnap Indians : सागरी चाच्यांचा धुमाकूळ, २२ भारतीयांसह ३० जणांचे अपहरण; येमेन आणि सोमालियाच्या समुद्रातील धक्कादायक घटना

येमेन : येमेन आणि सोमालियाच्या किनाऱ्याजवळ घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सागरी चाच्यांनी दोन व्यावसायिक

China Visa : भारतीयांना व्यावसायिक कामांसाठी चीनला जाणे झाले कठीण

बीजिंग : चीनने भारतीयांसाठी व्यावसायिक व्हिसाच्या नियमांमध्ये बदल के

Imran Khan : इम्रान खान यांना रात्री रुग्णालयात हलवले; वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा तुरुंगात पाठवले

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे संस्थापक इम्रान खान यांना रात्री कडक

Mehul Choksi's Lawyer : मेहुल चोक्सीच्या वकिलाच्या अडचणी वाढल्या; लंडनमध्ये लैंगिक अत्याचाराच्या चार आरोपांखाली अटक

लंडन : फरार हिरे व्यावसायिक मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांना ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली असून त्यांच्यावर

Kenya Helicopter Crash : केन्यामध्ये सफारीसाठी निघालेल्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; 5 अमेरिकन पर्यटकांसह सर्व 7 जणांचा मृत्यू

नैरोबी : केन्यामध्ये पर्यटकांना सफारीसाठी घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत

Prince Harry Meghan Markle UK Return : सहा वर्षांचा ‘वनवास’ संपणार? प्रिन्स हॅरी आणि मेगन ब्रिटनमध्ये परतण्याच्या तयारीत; मुलं शाही कुटुंबाच्या जवळ जाणार

लंडन : ब्रिटिश शाही कुटुंबापासून दूर झाल्यानंतर तब्बल सहा वर्षांनी प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्कल