हिंदू सणांवर टीका करायची राजकारणात फॅशन

सिलिंडर वादावर मंगलप्रभात लोढांचे विरोधकांना प्रत्युत्तर


मुंबई : मलबार हिलमधील १६ जैन मंदिरांना उत्सवासाठी प्रत्येकी पाच गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याची विनंती करणारे पत्र मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्य सरकारला लिहिल्यानंतर, विरोधकांनी त्यावर आक्षेप घेत टीकासत्र सुरू केले. मंत्री लोढा यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले असून, "हिंदू सणांच्या वेळी आणि धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर टीका करणे ही सध्या राजकारणात एक फॅशन झाली आहे," अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे. माझ्यावर होणारी टीका हा 'नॅरेटिव्ह'चा भाग आहे. परंतु, लोकप्रतिनिधी म्हणून भाविकांची सोय करणे हे माझे कर्तव्यच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


आपल्या भूमिकेचे समर्थन करताना लोढा म्हणाले की, "माझ्या मतदारसंघात रामनवमी, साई भंडारा किंवा जैन धर्माचे कार्यक्रम हे विशेष धार्मिक उत्सव असतात. या काळात गॅसचा पुरेसा साठा नसल्यास विशेष प्रयत्न करणे गरजेचे असते. माझ्याकडे साई भंडाऱ्याचे आयोजक आणि जैन धर्मीय लोक मदतीसाठी आले होते. अशा वेळी त्यांना सिलिंडर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे चुकीचे आहे का? आगामी काळात २ एप्रिलला हनुमान जयंती आणि १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या कार्यक्रमांसाठीही विशेष प्रयत्न करावेच लागतील, कारण ती आमदार म्हणून माझी जबाबदारी आहे", असेही त्यांनी सांगितले.


राज्यात गॅसचा तुटवडा नाही आणि सरकार उत्तम काम करत आहे. केवळ मोठ्या धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी तात्कालिक गरज पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करावे लागतात. अशा विषयांवरून विनाकारण तेढ निर्माण करणे थांबवावे, असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला. कोणाला वाद निर्माण करायचा असेल तर त्यांनी खुशाल करावा, पण मी माझ्या जबाबदारीपासून पळ काढणार नाही, असेही लोढा म्हणाले.

Comments
Add Comment

Jalgaon : स्मार्ट मीटरनंतरही वीज चोरी ? जळगावात महावितरणकडून दोघांविरोधात गुन्हे दाखल

Jalgaon : स्मार्ट मीटरमुळे थकबाकीपोटी वीजपुरवठा आपोआप खंडित होत असतानाही अनधिकृतपणे वीज जोडणी करून वीज वापर

Jalgaon : रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या विक्रेत्यांना दणका ! भुसावळ विभागाची मोठी कारवाई

Jalgaon : रेल्वे स्थानकांवर (Railway Station) प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी निर्धारित दरापेक्षा

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी