उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची अण्णा बनसोडे यांच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट..

उपराष्ट्रपती यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी चैत्यभूमी येथे येण्याचे शिष्ट मंडळाचे निमंत्रण..


मुंबई  : भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या शिष्टमंडळाने उपराष्ट्रपती भवन येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीत १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त चैत्यभूमी येथे उपस्थित राहण्याची विनंती उपराष्ट्रपतींना करण्यात आली. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत उपराष्ट्रपतींनी तत्काळ होकार दर्शवला.


यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत असताना चैत्यभूमीला दिलेल्या भेटींच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच दादर येथे सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कामाबाबतही त्यांनी शिष्टमंडळाकडे माहिती घेतली. स्मारकाच्या कामाला अधिक गती मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


दरम्यान, बोधगया संबंधित प्रश्नावरही शिष्टमंडळाने उपराष्ट्रपतींसोबत औपचारिक चर्चा केली. या प्रसंगी शिष्टमंडळाकडून उपराष्ट्रपतींना गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या.


या भेटीत सुनील मगरे, सिद्धार्थ बनसोडे, नागसेन कांबळे, भदंत राहुल बोधी, बाळासाहेब करडक, आनंद चंदनशिवे, संजय अवसरमोल, शिल्पकार अनिल सुतार,सुबोध भारत, विजय अंभुरे आणि रामनाथ दवणे आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Coastal Road-Sea Link Traffic Rules : मुंबईतील कोस्टल रोड आणि सी-लिंकवर वाहतूक निर्बंध; 'या' वाहनांना कायमस्वरुपी बंदी

मुंबई : मुंबईतील धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्ग (कोस्टल रोड) आणि राजीव गांधी

Mumbai Water Stock : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांत ९५.८३ टक्के पाणीसाठा; भातसा, तानसा, वैतरणा तलावांची स्थिती जाणून घ्या

मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख जलाशयांमध्ये एकूण १३,६८,९५८

Central Railway Block : कसारा मार्गावर १५ रात्रींचा ब्लॉक; टिटवाळा स्थानकावर प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम

मुंबई : मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टिटवाळा स्थानकावरील

Ganesh Idol Fitness Certificate : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय; १ टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक

मुंबई : भुलेश्वर येथे गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मोठ्या गणेशमूर्तींच्या

Mumbai Police Eid Security : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त; १० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात

मुंबई : ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुंबईत मोठ्या संख्येने मिरवणुका निघण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता