स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल

नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी राज्यभर चर्चेत असलेला स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्यावर शुक्रवारी (दि. २७) रात्री उशिरा आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा तर दुसरा आर्थिक फसवणुकीचा आहे. अशोक खरातविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात आतापर्यंत एकूण १० गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी २ आर्थिक फसवणुकीचे तर ८ महिला अत्याचाराचे आहेत. राजेंद्र जासूद व राजेंद्र भागवत यांनी आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत.


लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात, खरातने पीडित महिलेला आपण दैवी अवतार असल्याचे सांगत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. संबंधित महिला आपल्या वैवाहिक आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात, या उद्देशाने खरातकडे गेली होती. माहितीनुसार, पती-पत्नीचे २०१३ साली लग्न झाले होते. मात्र, त्यांच्यात सतत वाद होत असल्याने ते वेगळे राहत होते. एका व्यक्तीच्या सल्ल्याने त्यांनी आपला संसार सुरळीत करण्यासाठी २०२२ मध्ये प्रथमच खरातचा संपर्क साधला. त्यानंतर २०२४ मध्ये ते पुन्हा त्याच्याकडे गेले. या वेळी खरातने पतीला केबिनबाहेर बसवून पत्नीला आत बोलावले. तिला तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्यास देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.


यापूर्वी २०२२ मध्ये भेटीदरम्यान खरातने दाम्पत्याकडून त्यांच्या लग्नाची तारीख विचारून चुकीच्या तारखेमुळे वाद होत असल्याचे भासवले होते. त्यानंतर हे दाम्पत्य सुमारे ६ ते ७ वेळा त्याच्याकडे गेले होते. ऑगस्ट २०२४ मध्ये नाशिकमधील कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयातही महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. महिलेच्या तक्रारीनुसार, ऑगस्ट २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत तिच्यावर चार वेळा जबरदस्तीने गैरकृत्य करण्यात आले. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या प्रकरणात व्यवसायातील अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवत नेवाशातील एका व्यापाऱ्याकडून अडीच लाख रुपये व सोन्याच्या अंगठ्या घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.


व्हिडिओ व्हायरल प्रकरणी ७४ जणांवर कारवाई : या प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी कठोर कारवाई करताना नव्याने ६५ जणांवर गुन्हे दाखल केले असून, एकूण कारवाईचा आकडा ७४ वर पोहोचला आहे. यापूर्वी कोपरगाव येथे ३ तर नाशिक पोलिसांनी ६ जणांवर गुन्हे दाखल केले होते. अवघ्या तीन दिवसांत ७४ जणांवर कारवाई करण्यात आल्याने पोलिसांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

इराणचा कुवेतच्या बुबियान बेटावरील अमेरिकेच्या नौसैनिकांवर हल्ला

बुबियान बेट : इराणने कुवेतच्या बुबियान बेटावरील अमेरिकेच्या नौसैनिकांवर हल्ला केला. यात मोठ्या प्रमाणात

हुथी-हिजबुल्लाहच्या प्रवेशाने जगावर अणुयुद्धाचे संकट

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध आता एका महिन्यानंतर अत्यंत भीषण वळणावर पोहोचले

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा