हुथी-हिजबुल्लाहच्या प्रवेशाने जगावर अणुयुद्धाचे संकट

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध आता एका महिन्यानंतर अत्यंत भीषण वळणावर पोहोचले आहे. इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवर झालेले हल्ले आणि इराणने दिलेले प्रत्युत्तर यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या युद्धात आता येमेनमधील ‘हुथी’ बंडखोर आणि लेबनॉनमधील ‘हिज्बुल्ला’ या दोन्ही संघटनांनी उडी घेतल्याने मध्य-पूर्वेतील वातावरण अधिकच तापले आहे.


इराणमधील धार्मिक नेत्यांकडून आता अण्वस्त्रे बनवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. इराणने आधीच अण्वस्त्र निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या युरेनियमच्या संवर्धनाची पातळी वाढवली आहे. याच पार्श्वभूमीवर, इस्रायलने शुक्रवारी इराणच्या ‘यज्द’ येथील युरेनियम प्रोसेसिंग प्लांटवर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या इराणने इस्रायलला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला आहे.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या परिस्थितीवर भाष्य करताना म्हटले आहे की, "आम्ही मध्य-पूर्वेतील अण्वस्त्र धोक्यांना संपवत आहोत. माझ्या नेतृत्वाखाली अमेरिका या कट्टरपंथी राजवटीचा धोका 'ऑपरेशन एपिक फ्युरी'द्वारे नष्ट करत आहे. इराण गेल्या ४७ वर्षांपासून या भागात दहशत माजवत होता, पण आता तो बॅकफूटवर आहे."


येमेनच्या हुथी बंडखोरांनी प्रथमच इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्याने अरब देशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. तर, हिज्बुल्लाने कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्याची घोषणा केली आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने असा दावा केला आहे की, त्यांनी अमेरिकेचे एफ-१८ लढाऊ विमान पाडले आहे, ज्यामुळे तणाव शिगेला पोहोचला आहे.


येमेनमधून इस्रायलवर पहिला बॅलिस्टिक मिसाईल्स हल्ला : २८ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या युद्धाला आता एक महिना पूर्ण होत असताना, इराणचा मित्र असलेल्या येमेनमधील हूती बंडखोरांनी या संघर्षात अधिकृतपणे उडी घेतली आहे. शनिवारी सकाळी येमेनमधून इस्रायलच्या दिशेने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागण्यात आले, ज्याची पुष्टी इस्रायली संरक्षण दलाने केली आहे. येमेनमधून डागलेले हे क्षेपणास्त्र इस्रायलच्या दक्षिणेकडील बीयर शेबा आणि नेगेव वाळवंटी भागाच्या दिशेने येत होते. यामुळे संपूर्ण परिसरात धोक्याचे सायरन वाजले आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश देण्यात आले. इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे क्षेपणास्त्र हवेतच यशस्वीपणे रोखले आणि नष्ट केले.


हूथींचा ‘फिंगर ऑन ट्रिगर’ इशारा : या हल्ल्याच्या काही तास आधीच हूती बंडखोरांनी एका निवेदनात म्हटले होते की, "जर अमेरिका-इस्रायलचे इराणवरील हल्ले थांबले नाहीत, तर आमचे बोट ट्रिगरवर आहे." हा हल्ला त्याच इशाऱ्याचा भाग मानला जात आहे. येमेनच्या या हस्तक्षेपामुळे आता केवळ जमिनीवरच नाही, तर लाल समुद्रातील जागतिक व्यापारावरही संकट ओढवले आहे. हूतींनी यापूर्वीही लाल समुद्रात जहाजांवर हल्ले केले होते, आता त्यांनी आपला मोर्चा थेट इस्रायलकडे वळवला आहे.


नवा युद्ध मोर्चा : आतापर्यंत इस्रायल केवळ उत्तर सीमेवर हिजबुल्लाह (लेबनॉन) आणि पूर्व सीमेवर इराणशी लढत होता. मात्र, दक्षिणेकडून येमेनने हल्ला केल्यामुळे इस्रायलला आता तीन वेगवेगळ्या आघाड्यांवर लष्करी शक्ती विभागून लढावे लागणार आहे.


प्रादेशिक युद्धाचा धोका : तज्ज्ञांच्या मते, येमेनचा या युद्धात समावेश होणे हे एका मोठ्या 'प्रादेशिक युद्धाचे' संकेत आहेत. यामुळे लाल समुद्र आणि त्यातून होणारी जागतिक व्यापार वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची भीती आहे. इस्रायलच्या 'ॲरो' किंवा 'डेव्हिड्स स्लिंग' या संरक्षण यंत्रणांनी हे क्षेपणास्त्र नष्ट केले की नाही, याबाबत अधिकृत माहिती अद्याप हाती आलेली नाही. परंतू इस्रायल आता येमेनवरही हल्ले चढवण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Donald Trump : भारताकडून शिका!’ ट्रम्प यांचा अमेरिकेच्या निवडणूक व्यवस्थेवर निशाणा; SAVE Act साठी दबाव

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा SAVE America Act मंजूर करण्यासाठी काँग्रेसवर

Hayden Panettiere Passes Away : बालकलाकार ते हॉलीवूड स्टार! 'हिरोज' फेम अभिनेत्री हेडन पॅनेटीयरचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन

लॉस एंजिलीस : हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी 'हेडन

Indonesia Earthquake : इंडोनेशियाला पुन्हा भूकंपाचा धक्का; 5.7 तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांमध्ये भीती

इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Indonesia Earthquake : इंडोनेशियात ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा, मोठी जीवितहानी

इंडोनेशिया : इंडोनेशियाच्या पूर्व भागातील फ्लोरेस बेटाजवळ शनिवारी पहाटे ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप (Indonesia Earthquake)