इराणचा कुवेतच्या बुबियान बेटावरील अमेरिकेच्या नौसैनिकांवर हल्ला

बुबियान बेट : इराणने कुवेतच्या बुबियान बेटावरील अमेरिकेच्या नौसैनिकांवर हल्ला केला. यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे. अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही.


इराणचे लष्करी प्रवक्ते इब्राहिम झोल्फघारी यांनी व्हिडीओ निवेदन प्रसिद्ध केले आहे. अमेरिकेच्या जवानांना लक्ष्य करून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिका मागे हटणार नसेल तर अमेरिकेच्या सैनिकांवर आणखी संहारक हल्ले होतील, असेही त्यांनी सांगितले.


याआधी शनिवारी पहाटे झालेल्या इराणच्या एका वेगळ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यात अमेरिकेचे अनेक सैनिक जखमी झाले, असे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने दिले आहे. अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर हे वृत्त दिल्याचेही त्या बातमीत नमूद आहे. पेंटागॉनने अद्याप दोन्ही हल्ल्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


एकीकडे इराण अमेरिकेच्या सैनिकांना लक्ष्य करण्यासाठी हल्ले करत असताना दुसरीकडे येमेनी शिया हौती बंडखोरांनी इस्रायलच्या डिमोना आण्विक प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला करून थेट युद्धात प्रवेश केला. यामुळे रेड सी अर्थात लाल समुद्रातून बाब अल-मंदाब सामुद्रधुनीमार्गे (Bab al-Mandab Strait) होणारा तेलाचा पुरवठा बंद पडण्याचा धोका वाढला आहे. होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) आणि बाब अल-मंदाब सामुद्रधुनी या दोन्ही ठिकाणी तेल वाहतुकीवर बंधनं आणली गेल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे ऊर्जा संकट निर्माण होण्याचा धोका आहे.

Comments
Add Comment

Pakistan Coal Mine Blast : बलुचिस्तान हादरलं! कोळसा खाणीतील स्फोटात ३२ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

क्वेटा : पाकिस्तानातील बलुचिस्तान (Balochistan) प्रांताची राजधानी क्वेटा (Quetta) शहराजवळील एका कोळसा (Coal) खाणीत भीषण स्फोट (Blast)

Hamas : ट्रम्प यांची मोठी घोषणा! हमासच्या पूर्ण निःशस्त्रीकरणानंतर गाझातून इस्रायली सैन्य माघारी

गाझा (Gaza) संघर्ष संपवण्याच्या दिशेने महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. हमास (Hamas) आणि इस्रायल (Israel) यांच्यात व्यापक

Spain Migration : स्पेनच्या स्यूटा सीमेजवळ हजारोंची घुसखोरी; समुद्रातून प्रवेशाच्या प्रयत्नांत १८ जणांचा मृत्यू

स्पेन : स्पेन (Spain) आणि मोरोक्को (Morocco) यांच्या सीमेलगत असलेल्या स्यूटा (Ceuta) या स्पेनच्या स्वायत्त शहरात मोठे स्थलांतर

Iran - America War : जॉर्डनमधील हल्ल्यानंतर अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर हल्ले

वॉशिंग्टन : जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळावरील हल्ल्यानंतर अमेरिकेने इराणविरोधात मोठी लष्करी मोहीम सुरू केली

World Record Flight : हवेत सलग २४ तासांपेक्षा जास्त वेळ! क्वांटास एअरलाइन्सच्या विमानाने रचला ऐतिहासिक जागतिक विक्रम

तुलूझ : ऑस्ट्रेलियन विमान कंपनी ‘क्वांटास’ने (Qantas) नागरी विमान वाहतूक क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे. एका विशेष

Japan : जपान मध्ये कचरा टाकणे UPSC पेक्षाही कठीण; भारतीय महिलेचा अनुभव ,जपानची अनोखी व्यवस्था पाहून भारतीय महिला चक्रावली

जपान : स्वच्छतेबाबत जगभरात जपानचं नाव आदराने घेतलं जातं. तिथे स्वच्छता ही केवळ सरकारी मोहीम नसून प्रत्येक