मुंबईत डासांचा प्रादुर्भाव, पण मशिन्स पडल्या बंद

- प्रशासनाने दिली कबुली, म्हणाले देखभालीचे कंत्राट संपले


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबईतील विविध भागांमध्ये सध्या डासांचा उपद्रव वाढत चालला असून या वाढत्या उपद्रवाला प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेच्यावतीने धूर फवारणी तसेच औषध फवारणीचे प्रयोग केले जातात. मात्र, मुंबईतील अनेक भागांमध्ये याप्रकारच्या धूर फवारणीची मशिन्सच बंद पडत असल्यामुळे मोठ्याप्रमाणात धुम्र फवारणी केली नाही. परिणामी मुंबईतील डास प्रतिबंधक उपायोजना प्रभावी राबवली जात नसून यामुळे मोठ्याप्रमाणात नागरिकांना डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे समोर आले आहे.


मुंबई महापालिकच्या एस विभागातील किटक नियंत्रण अधिकारी खात्यांतर्गत अळीनाशक फवारणी, धुम्रफवारणी, मक्षिका नियंत्रण, मुषक नियंत्रण इत्यादी प्रकारचे कामे करण्यासाठी संस्थेला मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत आला असता, शिवसेनेचे अमेय घोले यांनी एका प्रभागासाठी दोन धुम्र फवारणी मशिन देण्याची मागणी केली. सध्या एकच मशिन असल्यामुळे सर्वच परिसरात धुम्र फवारणी करता येत नाही असे सांगितले. झोपडपट्टी भागांमध्ये मुषकांचा उपद्रव अधिक असून त्या डासांचाही प्रार्दुभाव अधिक आहे. परंतु यातील काही मशिन्स या आग निघत असल्यामुळे त्या बंद आहेत. तर प्रिती सातम यांनी यापूर्वी न्यायालयाने किंवा अन्य प्राधिकरणाने धूर फवारणी करण्यास काही प्रतिबंध करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते का आणि त्यामुुळे धूर फवारणीचे प्रमाण कमी केले का असा सवाल केला. तर सभागृहनेतेे गणेश खणकर यांनी पूर्वी धूर फवारणीबरोबरच बादलीमध्ये औषध घेवून खाकी वर्दीतील कामगार यायचे. पण ते आता मुंबईतून गायब झाले आहेत. त्यामुळे यातील बऱ्याचशा मशिन्स या बंद असून हे धडगे खांद्यावर घेवून ते फिरत आहेत. त्यामुळे याचे देखभाल करण्याचे कंत्राट बंद झाले का असा सवाल महापालिका कधीतरी मुंबईकरांचा विचार करणार आहे की नाही. यावर श्रध्दा जाधव, डॉ सईदा खान, जमीर कुरेशी, अश्रफ आझमी आणि अजंता यादव यांनी विभागातील डासांच्या प्रादुर्भाव आणि धुम्र फवारणीची समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी या धुर फवारणीच्या मशीन्सची खरेदी सन २००८ साली करण्यात आली होती. त्यामुळे याला १८ वर्षे झाली आहेत.त्यामुळे २२७ मशिन्सच्या वार्षिक देखभालीकरता असलेले कंत्राट सपुष्टात आले असून यासाठीची निविदा प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत या मशिन्सचा वापर पूर्ण क्षमतेने होईल,असे स्पष्ट केले.

Comments
Add Comment

नालेसफाईतील हातसफाई एआयमुळे समोर, मागील वर्षी तब्बल १२ ते १५ कोटींचा झाला कंत्राटदारांना दंड

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्यावतीने मागील वर्षी दोन वर्षांच्या कालावधीसाठी छोट्या,मोठ्या आणि

मुंबईतील भूजलात खारटपणा वाढण्याचा धोका

- राष्ट्रीय जलभांडार नकाशांकन व व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत निष्कर्ष मुंबई (विशेष प्रतिनिधी) पाण्याचे

BMC : मुंबई महापालिकेच्या सहआयुक्त पदी एम. देवेंदर सिंह, गंगाधरण यांची बदली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेतील सर्वात निष्क्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाणारे सहआयुक्त गंगाधरण डी,

अशोक खरात प्रकरण भोवलं; रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात याला बलात्कार, महिलांशी गैरवर्तन, महिलांची फसवणूक अशा गंभीर

चार सहायक आयुक्तांच्या बदल्या, गजानन बेल्लाळे यांची घाटकोपर मधून बदली, कुलाबा,नरिमन पॉइंटची जबाबदारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्तांची खांदे पालट करण्यात आली असून मुंबईच्या महापौर

मुंबई महानगर क्षेत्रात २०२५ मध्ये १.३३ लाख कोटी रुपयांची घरविक्री

मुंबई : भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात मुंबई महानगर क्षेत्राने अर्थात MMR ने २०२५ या वर्षात ऐतिहासिक कामगिरी