Deccan Queen : ९६ वर्षांची 'दख्खनची राणी' नटली, सोफा सेट, वार्ली आर्ट अन्...डायनिंग डब्याचं नूतनीकरण; मुंबई-पुणेदरम्यानचा रॉयल प्रवास

मुंबई : मुंबई आणि पुणे दरम्यान धावणारी रेल्वेची शान, म्हणजेच 'डेक्कन क्वीन' (दख्खनची राणी), आता ९६ वर्षांची झाली असली तरी तिचे आकर्षण आजही कायम आहे. या ऐतिहासिक गाडीच्या प्रवाशांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. डेक्कन क्वीनला आता एका अत्यंत आधुनिक आणि आकर्षक अशा 'डायनिंग कार'ने (जेवणाचा डबा) सजवण्यात आले आहे. या नव्या डब्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यावर साकारण्यात आलेली 'वारली चित्रकला'. महाराष्ट्राची लोककला असलेल्या वारली पेंटिंग्जमुळे या डायनिंग कारला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. यामुळे प्रवाशांना आता मुंबई-पुण्याच्या प्रवासात केवळ चमचमीत खाद्यपदार्थांचा आस्वादच घेता येणार नाही, तर डोळ्यांना सुखद वाटणाऱ्या पारंपरिक कलेचा अनुभवही घेता येईल. साडेतीन तासांचा हा प्रवास आता अधिक शाही आणि कलात्मक होणार आहे.



शुक्रवारपासून सेवा सुरू


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित 'ट्रेन महोत्सव' कार्यक्रमादरम्यान या नव्या धाटणीतील डब्यासह ही गाडी दिमाखात पुण्याकडे रवाना झाली. गेल्या महिन्याभरापासून या डायनिंग कारच्या आधुनिकीकरणाचे काम सुरू होते, ज्यामुळे प्रवाशांची तात्पुरती सोय करण्यासाठी पॅन्ट्री कार जोडण्यात आला होता. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी हाती घेतलेले हे नूतनीकरणाचे काम आता यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे, डायनिंग कारची सुविधा असलेली ही देशातील एकमेव गाडी असल्याने प्रवाशांमध्ये या नव्या सुविधेबाबत प्रचंड उत्सुकता आहे. आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज झालेल्या या डब्यामुळे प्रवाशांचा साडेतीन तासांचा प्रवास आता अधिक सुखकर आणि चविष्ट होणार आहे. वातानुकूलित आणि विनावातानुकूलित डब्यांतील सर्व स्वच्छतागृहांना आकर्षक विनाइल लावून नव्या स्वरूपात सादर करण्यात आले आहे. वातानुकूलित डब्यातील आसनांना सीट कव्हर्स बसवण्यात आले. छत आणि पॅनल बोर्ड बदलून नव्या संकल्पनेवर डिझाइन देण्यात आल्यामुळे डब्यांतील सजावट प्रवाशांच्या कौतुकास पात्र ठरत आहे. एसी डब्यांमध्ये एअर फ्रॅग्रन्स डिस्पेंसर, स्वच्छतेसाठी टिश्यू पेपर डिस्पेंसर, साबण वितरक आणि ड्युरो वाइप मॅट्सची सुविधा सर्व स्वच्छतागृहांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.



डेक्कन क्वीन'च्या डायनिंग कारचा 'फाईव्ह स्टार' लूक


मुंबई-पुणे प्रवासाची शान असलेल्या 'डेक्कन क्वीन'च्या डायनिंग कारचा कायापालट झाला असून, आता प्रवाशांना विमानासारखा किंवा एखाद्या अलिशान हॉटेलसारखा अनुभव रेल्वेमध्ये घेता येणार आहे. या डब्यातील जुन्या खुर्च्यांच्या जागी आता आरामदायी सोफा पद्धतीची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. डब्यातील दिव्यांची रचना बदलून ती अत्यंत आकर्षक आणि 'लक्झरी' स्वरूपात केल्याने डब्याला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे. डब्याच्या अंतर्गत भागावर महाराष्ट्राची ओळख असलेली 'वारली चित्रकला' विनाइल रॅपिंगच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे. केवळ आधुनिकता नाही, तर इतिहासाची साक्ष देण्यासाठी या डब्यात सन १९३० मधील या एक्स्प्रेसचे काही दुर्मिळ आणि मनोवेधक फोटो लावण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांना चविष्ट जेवणासोबतच डेक्कन क्वीनच्या ९६ वर्षांच्या प्रवासातील जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधीही मिळणार आहे.



'बेस्ट'ला मिळणार महापालिकेचे बळ!


'बेस्ट'ला केवळ सेवा म्हणून नव्हे तर आर्थिकदृष्ट्या सक्षम संस्था म्हणून उभे करण्यासाठी पालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. वाढत्या आर्थिक तुटीच्या पार्श्वभूमीवर, पालिकेचा हा पुढाकार 'बेस्ट'साठी मोठा दिलासा ठरणार आहे. या सक्षमीकरणामध्ये केवळ बस सेवा सुधारण्यावरच भर दिला जाणार नाही, तर कर्मचाऱ्यांच्या हिताचाही विचार केला जाणार आहे. विशेषतः सेवानिवृत्त कामगार आणि कर्मचाऱ्यांचे ग्रॅच्युइटी (उपदान) आणि इतर प्रलंबित कायदेशीर देणी लवकरात लवकर अदा करण्याबाबत प्रशासन अत्यंत संवेदनशील आहे.

Comments
Add Comment

Jyoti waghmare : ज्यांना पक्ष सांभाळता येत नाही, ते राज्य काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंनी 'साहेब' म्हटले, पण उद्धव ठाकरेंनी...; ज्योती वाघमारेंचा घणाघात

नांदेड : राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे सध्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी शिवसेना

निवासी व व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी व पीएनजी गॅसचा अधिक चांगला व सुलभ पुरवठा उपलब्ध करून देणे, तसेच निश्चित कालावधीत पीएनजी सेवांचा विस्तार करणेबाबत दिल्लीत बैठक संपन्

राज्यात पीएनजी नेटवर्क वाढीसाठी केंद्र शासनाकडून तांत्रिक सहाय्य तसेच पायाभूत सुविधा उभारणीसाठी आर्थिक पाठबळ

Weather Update : हवामानाचा ‘डबल अटॅक’! मुंबईत उकाड्याचा कहर तर विदर्भात वादळी पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात हवामानाने अचानक कोंडी केली असून एका बाजूला मुंबई (Mumbai) मध्ये उकाड्याने अक्षरशः घामाच्या धारा सुरू

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणाला वेग; एसआयटीकडून पुन्हा कार्यालयाची झडती

नाशिक : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा हालचालींना वेग दिला आहे. शुक्रवारी (२७ मार्च)

CM Devendra Fadnavis : राज्यात पीएनजीला वेग, खतसाठ्यावर सतत नजर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने संतुलित आणि प्रभावी धोरण अवलंबले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी

कुंभपूर्व विकास कामांना गती; मंत्री गिरीश महाजन यांची अचानक पाहणी

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सुरू असलेल्या विकास कामांना गती देण्यात आली