कुंभपूर्व विकास कामांना गती; मंत्री गिरीश महाजन यांची अचानक पाहणी

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सुरू असलेल्या विकास कामांना गती देण्यात आली असून, शासन व प्रशासन ‘ॲक्शन मोड’मध्ये कार्यरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज नाशिक दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावल्यानंतर शहरातील महत्त्वाच्या विकास कामांची अचानक पाहणी करून कामांच्या गुणवत्तेबाबत कडक निर्देश दिले.यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, रस्त्यांच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई सहन केली जाणार नाही. शहरातील नागरिकांना दीर्घकाळ टिकणारे, अत्यंत दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी प्रशासन व संबंधित ठेकेदारांनी प्रामाणिकपणे काम करावे. कामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता नियंत्रण राखले जावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मंत्री महाजन यांनी नाशिक शहरातून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गांपैकी गरवारे पॉईंट ते अंबड लिंक रोड या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाची पाहणी केली. हा मार्ग कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, वाहतूक सुलभतेसाठी या कामाला प्राधान्य दिले जात आहे.


तसेच त्र्यंबक नाका परिसरातील जिल्हा रुग्णालयासमोरील काँक्रिटीकरणाच्या (व्हाईट टॉपिंग) कामाचीही त्यांनी पाहणी केली. या ठिकाणी कामाची गती, दर्जा आणि नियोजन याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली व तसेच काँक्रिटीकरण करणासाठी आवश्यक खडी,सिमेंट व इतर आवश्यक साधनसामग्री तितक्याच गुणवत्तापूर्ण असावी याबाबत आवश्यक ते निर्देश त्यांनी यावेळी दिलेत. या पाहणी दौऱ्यावेळी महापौर हिमगौरी आडके, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, शहर अभियंता संजय अग्रवाल, संदेश शिंदे ,कार्यकारी अभियंता मनपा, निलेश साळी उपकार्यकारी अभियंता, मनपा यांच्यासह महापालिका व प्रशासनातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.


सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात रस्ते, पायाभूत सुविधा आणि नागरी सोयीसुविधांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असून, या कामांची वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्तता करण्यासाठी शासन स्तरावरून सातत्याने आढावा घेतला जात आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या या पाहणीमुळे संबंधित यंत्रणांना अधिक वेगाने व काटेकोरपणे काम पूर्ण करण्याचा संदेश मिळाला आहे.

Comments
Add Comment

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि

Amravati : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूची NHRCकडून स्वतःहून दखल; महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस

अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा