Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणाला वेग; एसआयटीकडून पुन्हा कार्यालयाची झडती

नाशिक : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा हालचालींना वेग दिला आहे. शुक्रवारी (२७ मार्च) विशेष तपास पथक (SIT) आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खरात यांच्या प्रॉपर्टी खरेदी-विक्री कार्यालयात जाऊन झडती घेतली. यावेळी काही महत्त्वाची माहिती आणि कागदपत्रे हाती लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.


भोंदू बाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मुदत रविवारी संपणार असल्याने तपास यंत्रणा अधिक सक्रिय झाल्या आहेत. विविध प्रकरणांच्या अनुषंगाने तपास सुरू असून, त्यात वनविभागाच्या कायद्यांनुसारही स्वतंत्र तपास करण्यात येत आहे. तसेच, या प्रकरणांमध्ये नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.


दरम्यान, तपास पथकाने पूर्वी सील केलेले कार्यालय पुन्हा उघडून तपास केला आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याचे सांगितले जात आहे. जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांचा सध्या सखोल अभ्यास सुरू आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.या प्रकरणातील तपास पुढील काही दिवसांत आणखी वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या