Dr. Jaysingrao Pawar : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

- मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली


मुंबई : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे गुरुवारी (२६ मार्च) पहाटे निधन झाले. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते म्हणून डॉ. जयसिंगराव पवार यांची ओळख होती.


गेल्या काही दिवसांपासून डॉ. पवार यांची प्रकृती अस्वस्थ होती. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे जवळपास दीड महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू होते. दरम्यान गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी कोल्हापुरात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठेशाहीचा इतिहासकार हरपल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.


जयसिंगराव पवार यांनी महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे, मराठेशाहीचा मागोवा, राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ यासारखे २५ हून अधिक इतिहासविषयक ग्रंथ लिहिले.


राजर्षी शाहू महाराजांचे कार्य आणि धोरणे समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी डॉ. पवार आयुष्यभर झटत होते. इतिहासाचा भाग असलेल्या करवीर संस्थापिका ताराराणी यांच्या चरित्र लेखनातून त्यांच्या कर्तृत्वाची ओळख करुन देण्याची महत्त्वाची कामगिरी त्यांनी बजावली. राजर्षी शाहू महाराजांच्या चरित्राला न्याय देण्याचं काम त्यांनी कृतज्ञतेपोटी केले. दादोजी कोंडदेव यांच्याविषयी महत्त्वाची मांडणीही डॉ. पवारांनी केली. पंचगंगा तिरी हे डॉ. जयसिंगराव पवार यांचं आत्मचरित्र विशेष गाजले.


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री ऐकणं शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी डॉ. जयसिंगराव पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.



काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस ?


डॉ. पवार यांनी इतिहास संशोधन आणि अभ्यासाला वाहून घेतले होते. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या चरित्रांचा अनेक अंगांनी वेध घेणारी मांडणी त्यांनी केली. विशेषतः शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राच्या माध्यमातून त्यांनी इतिहास लेखन, संशोधन- प्रकल्पांना चालना दिली. त्यामुळेच शिवचरित्रासह, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब ते महाराणी ताराराणी आणि राजर्षी छत्रपती शाहू यांच्याविषयी विपुल संदर्भ साहित्याची निर्मिती झाली. डॉ. पवार यांच्या पुढाकारामुळे राजर्षी शाहू छत्रपती यांचे कार्य इंग्रजीसह, अन्य विदेशी तसेच भारतीय भाषांमध्ये पोहोचले. यातून निर्माण झालेली ग्रंथसंपदा ही महाराष्ट्रासाठी संचित ठरणारे आहे. डॉ पवार यांच्या निधनामुळे इतिहास संशोधन क्षेत्रातील व्यासंगी मार्गदर्शक हरपला आहे. ही महाराष्ट्राची मोठी हानी आहे. त्यांच्या निधनाने पवार तसेच त्यांच्या संशोधक विद्यार्थी परिवारावर दुःखाचा आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे नमूद करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.



इतिहास संशोधनातील दीपस्तंभ हरपला - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे


महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनामुळे शिवचरित्राचा आणि मराठा इतिहासाचा वस्तुनिष्ठ मागोवा घेणारा एक व्यासंगी संशोधक हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. डॉ. जयसिंगराव पवार यांनी आयुष्यभर महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास लोकांसमोर मांडण्याचे काम केले. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर त्यांनी केलेले संशोधन मार्गदर्शक ठरले आहे. त्यांच्या निधनामुळे ऐतिहासिक संशोधन क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.



शाहू विचारांचा इतिहासकार हरपला - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार


ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असून महाराष्ट्रासाठी ही मोठी हानी आहे. मराठेशाहीचा खरा इतिहास जगासमोर आणणारा शाहू विचारांचा इतिहासकार हरपला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणी, छत्रपती राजाराम महाराज, संताजी-धनाजी, राजर्षी शाहू महाराज, रामचंद्र पंत अमात्य ते क्रांतिसिंह नाना पाटील यांसारख्या इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांचा सखोल अभ्यास करून डॉ. जयसिंगराव पवार यांनी वस्तुनिष्ठ आणि दस्तऐवजांवर आधारित इतिहास लेखन केले. मराठेशाहीतील इतिहासावरील गैरसमज दूर करून वास्तववादी इतिहास समाजासमोर मांडण्याचे त्यांचे कार्य अत्यंत मोलाचे आहे.


जयसिंगराव पवार यांची प्रकाशित पुस्तकं :

  • महाराणी ताराबाई

  • क्रांतिसिंह नाना पाटील

  • सेनापती संताजी घोरपडे

  • संभाजी स्मारक ग्रंथ

  • मराठेशाहीचा मागोवा

  • मराठी साम्राज्याचा उदयास्त

  • शिवचरित्र- एक मागोवा

  • शिवचरित्रापासून काय शिकावे?

  • आमच्या इतिहासाचा शोध व बोध

Comments
Add Comment

धक्कादायक! हॉस्पिटलच्या टीमनेच केला नवजात बाळाचा ३ महिन्यापेक्षा अधिक सांभाळ

सांगली : सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हॉस्पिटलमध्ये २६ नोव्हेंबर २०२५

जालन्यात इंधन वितरणावर निर्बंध; पोलीस बंदोबस्तात पेट्रोल-डिझेल वाटप

जालना: जालना शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. साठा कमी पडत असल्यामुळे शहरातील

रामनवमीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते बंद राहतील

पुणे: देशभरात आज रामनवमीचा सण मोठ्या उत्सहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. प्रभू श्रीरामचंद्र

Ashok Kharat: व्हायरल व्हिडीओने खळबळ, अशोक खरात एचआयव्ही पॉझिटिव्ह?

मुंबई: महिलांवरील अत्याचार आणि फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाब अशोक खरात प्रकरणी दररोज नवे धक्कादायक

स्वातंत्र्यवीरांच्या जीवनावरील 'रिसर्च प्रोजेक्ट'ला मंजुरी

डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर करणार संशोधन बीड : बीड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य व

पुणे - अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी ‘ॲप’चा वापर

पुणे : शहरात होणारी अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.