मद्यप्रेमींच्या खिशाला लागणार कात्री, बिअर आणि दारुच्या किमती वाढणार?

मुंबई: दारु पिणाऱ्यांच्या खिशाला लवकरच कात्री लागू शकते. कारण दारुच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढत्या उत्पादन खर्चामुळे भारतीय मद्य बाजारपेठेत किमती वाढण्याचे संकेत मिळत आहेत. बिअर उत्पादकांनी आगामी उन्हाळ्यात पुरवठा विस्कळीत होण्याचा इशारा दिला असून, मद्य उत्पादक संघटनांनी राज्यांकडे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या (IMFL) किमती सुधारण्याची विनंती केली आहे.



दारू दरवाढीची मुख्य कारणे



गेल्या काही आठवड्यांत पॅकिंग मटेरियलच्या किमतीत १०-१२ टक्के वाढ झाली आहे. काचेच्या बाटल्यांच्या किमती २० टक्क्यांनी वाढल्या आहेत, तर ॲल्युमिनियमच्या टंचाईमुळे बिअर कॅन्सच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. इंधन दरवाढीमुळे मालवाहतूक खर्च १० टक्क्यांनी महागला असून, त्याचा थेट परिणाम मद्याच्या अंतिम किमतीवर होत आहे.



रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम?



'ब्र्युअर्स असोसिएशन ऑफ इंडिया'च्या मते, जागतिक संघर्षांमुळे कच्च्या मालाचा पुरवठा साखळीवर मोठा ताण आला आहे. कागदी पुठ्ठ्यांच्या किमती चक्क १०० टक्क्यांनी वाढल्या आहेत. तसेच एलएनजीच्या (LNG) तुटवड्यामुळे काचेच्या बाटल्यांचे उत्पादनही प्रभावित झाले आहे.


'कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेव्हरेज कंपनीज' (CIABC) नुसार, रुपयाचे कमकुवत होणे आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे मद्य उद्योगावर मोठा दबाव आहे. राज्यांनी जर किमती वाढवण्यास परवानगी दिली नाही, तर उत्पादकांना तोटा सहन करावा लागेल आणि बाजारात तुटवडा निर्माण होऊ शकतो.



ग्राहकांवर काय परिणाम होणार?



जर राज्य सरकारांनी मद्य उत्पादकांची मागणी मान्य केली, तर बिअर आणि विदेशी मद्याच्या बाटलीमागे किमान ५ ते १० टक्के दरवाढ होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याच्या दिवसात बिअरची मागणी वाढते, अशा वेळी हा तुटवडा मद्यप्रेमींसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो.

Comments
Add Comment

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल १०० डॉलरच्या खाली घसरल्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील शांततेच्या आशेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आज पुन्हा एकदा

सततच्या आजारपणाने त्रस्त झाल्या सोनिया गांधी

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना तब्येत बिघडल्यामुळे मंगळवारी

कर्नाटकात खळबळ, माजी आमदाराच्या मुलाची हत्या; जळालेल्या कारमध्ये...

धारवाड: कर्नाटकच्या धारवाडजवळील एका निर्जनस्थळी जळालेल्या कारमध्ये कोळसा झालेला मृतदेह सापडल्याने हत्येचा

Indian Railway Rules: रेल्वे तिकीट आठ दिवसांपूर्वी रद्द केल्यावर रिफंड...; रेल्वेच्या नियमांत महत्त्वाचा बदल

नवी दिल्ली: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी रेल्वे तिकीट प्रणाली आणि प्रवाशांच्या

Sonia Gandhi: सोनिया गांधींची प्रकृती बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक मंगळवारी रात्री

Supreme Court : अन्य धर्म स्वीकारल्यास एससी-एसटी दर्जा होणार रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एससी-एसटी अधिनियमासंदर्भात आज, मंगळवार २४ मार्च रोजी मोठा निर्णय दिला आहे.